Saturday, November 27, 2021
Home क्रीडा T20 World Cup : भारताची सगळ्यात मोठी मॅच पाकिस्तानशी, पण या दोन...

T20 World Cup : भारताची सगळ्यात मोठी मॅच पाकिस्तानशी, पण या दोन टीम सर्वात धोकादायक


मुंबई, 17 ऑगस्ट : टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची आयसीसीने (ICC T20 World Cup) घोषणा केली आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला मुकाबला पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला होणार आहे. भारताने आतापर्यंत फक्त एकदाच 2007 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे, त्यामुळे टीम इंडिया विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा स्पर्धा जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत युएई आणि ओमानमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाईल.
आयसीसीने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबरला महामुकाबला रंगेल. भारतासाठी ही वर्ल्ड कपमधली सगळ्यात मोठी मॅच मानली जात आहे. टी-20 वर्ल्ड कपचं रेकॉर्ड बघितलं तर या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जास्त जड आहे. दोन्ही टीम टी-20 वर्ल्ड कपमध्ये 5 वेळा एकमेकांसमोर आल्या, यातल्या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला. पण न्यूझीलंड (New Zealand) आणि श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) भारताला वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच जिंकता आली नाही. या दोन्ही टीम या वर्ल्ड कपमध्येही भारतासाठी धोकादायक ठरू शकतात.
भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरोधात, असं असणार टी-20 विश्वचषकाचं शेड्यूल
टीम इंडिया 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध आणि 3 नोव्हेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 मॅच झाल्या, या दोन्ही वेळा भारताला पराभव पत्करावा लागला. काहीच दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेला पराभवही टीम इंडिया विसरली नसेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्येही न्यूझीलंडने भारताला हरवलं होतं.
भारताने अफगाणिस्तानचा दोनवेळा पराभव केला आहे. टीम इंडिया 5 नोव्हेंबरला क्वालिफायरमधून आलेल्या ग्रुप बीच्या टॉप टीमविरुद्ध खेळेल आणि 8 नोव्हेंबरला क्वालिफायरच्या ग्रुप एच्या दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या टीमसोबत भारताची लढत होईल. या दोन टीम श्रीलंका आणि बांगलादेश असण्याची शक्यता आहे.
बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या तिन्ही मॅच जिंकल्या होत्या, तर श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही मॅचमध्ये भारताला पराभूत व्हावं लागलं.
सुपर-12 राऊंडमध्ये प्रत्येक टीमना 6-6 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. सेमी फायनलमध्ये ग्रुप-एच्या दोन आणि ग्रुप-बीच्या दोन टीम जातील. टी-20 वर्ल्ड कपचा हा 7 वा सिझन आहे. वेस्ट इंडिजच्या टीमने सर्वाधिक 2 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. याशिवाय भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडने प्रत्येकी 1-1 वेळा ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाने 5 वनडे वर्ल्ड कप जिंकले असले, तरी त्यांना एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. यंदाच्या वर्ल्ड कपची फायनल 14 नोव्हेंबरला दुबईमध्ये होणार आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#T20 #World #Cup #भरतच #सगळयत #मठ #मच #पकसतनश #पण #य #दन #टम #सरवत #धकदयक

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

Most Popular

स्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : बहुतांश सर्वसामान्य लोकांची दोन स्वप्नं (Dreams) असतात. स्वतःच्या मालकीचं घर घेणं (Own House) आणि कार (car) घेणं. कार...

IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार?

नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 27 नोव्हेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा...

कान स्वच्छ करण्यासाठी चुकूनही वापरू नका बड्स; त्याऐवजी या सोप्या ट्रिक्स वापरा

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी बड्सचा वापर करतात. परंतु, कानांविषयीच्या तज्ज्ञांच्या मते, असं करणं कानासाठी धोकादायक ठरू शकतं....