‘टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये स्थान न मिळाल्यामुळे दु:खी आहे. वर्ल्ड कप खेळणं माझं लक्ष्य होतं. न्यूझीलंडसाठी मी अखेरची मॅच खेळलो, असं वाटत आहे,’ असं मुन्रो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर म्हणाला.
कॉलिन मुन्रो रोहित शर्मानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू आहे. मुन्रोच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 3 शतकं आहेत. ओपनर असलेल्या मुन्रोने न्यूझीलंडला अनेक मॅच जिंकवल्या, पण त्याची टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड झाली नाही.
मुन्रोने न्यूझीलंडसाठी 65 टी-20 मॅचमध्ये 31.35 च्या सरासरीने 1,724 रन केले. मुन्रोच्या नावावर 3 शतकं आणि 11 अर्धशतकं आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही तब्बल 156 पेक्षा जास्त आहे. मुन्रोशिवाय रॉस टेलर, कॉलिन डिग्रॅण्डहोम आणि फिन एलन यांनाही टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी देण्यात आलेली नाही.
टी-20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडची टीम
केन विलियमसन, टॉड एस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क कॅम्पमन, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मार्टीन गप्टील, काईल जेमिसन, डॅरेल मिचल, जिम्मी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅन्टनर, टीम सायफर्ट, इश सोदी, टीम साऊदी, एडम मिल्ने
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#T20 #World #Cup #करयर #सपल #ट20 #शतक #ठकणर #कव #करकटपट #झल #इमशनल