Saturday, July 2, 2022
Home करमणूक Sushant Singh Rajput Drugs Case : रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा वाढ, NCB...

Sushant Singh Rajput Drugs Case : रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा वाढ, NCB कडून खटला दाखल | sushant singh rajput drugs case ncb file charge shit against rhea chakrabortyबॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतरच्या ड्रग्स प्रकरणाचा तपास मागच्या दोन वर्षांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो करत असून आता त्यांनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि अन्य काहींच्या विरोधात मुख्य आरोपी म्हणून न्यायालयात खटला दाखल केला आहे. संपूर्ण तपासात एनसीबीनं सुशांतसाठी ड्रग्स विकत घेणे आणि त्याला ते पुरवल्याबद्दल रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविकसह अन्य काहींना या प्रकरणात मुख्य आरोपी ठरवलं आहे.

विशेष सरकारी वकील अतुल सरपंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपींवर चार्जशीटवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यांनी ही ड्राफ्ट चार्जशीट दाखल करुन घेताना सांगितलं, ‘अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांनी ड्रग्सचा वापर केला होता आणि सुशांतसिंह राजपूतसाठी त्यांनी याची खरेदी केली होती.’ याशिवाय न्यायालयाकडून सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले जाणार होते, मात्र काही आरोपींनी दोषमुक्तीचे अर्ज दाखल केल्याने तसे होऊ शकले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा- “सेल…सेल…सेल…एमएलए ले लो…” महाराष्ट्रातील राजकीय पार्श्वभूमीवर ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

दरम्यान जोपर्यंत दोषमुक्तीच्या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत काही आरोपींवरील आरोप निश्चित करता येणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीसाठी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती न्यायालयात हजर होते. विशेष न्यायाधीश व्ही जी रघुवंशी आता १२ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर तपासात समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला सप्टेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली होती. जवळपास १ महिना तुरुंगात राहिल्यानंतर रियाचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं मान्य केला होता. सुशांतसिंह राजपूतनं १४ जून २०२० रोजी मुंबईतील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणाला आता २ वर्ष झाली आहेत. मात्र यावर अद्याप एनसीबीकडून तपास सुरू आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Sushant #Singh #Rajput #Drugs #Case #रय #चकरवरतचय #अडचणत #पनह #वढ #NCB #कडन #खटल #दखल #sushant #singh #rajput #drugs #case #ncb #file #charge #shit #rhea #chakraborty

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

Most Popular

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

अखेर बाप-लेकीची होणार भेट? अभिजीत खांडकेकरच्या भूमिकेत येणार मोठा ट्विस्ट

मुंबई: 'तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यामध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या (Abhijeet Khandkekar)...

Nashik Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यातील 567 कोटींच्या कामांना ब्रेक, भुजबळांना दणका

Nashik Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कामांचा सपाटा लावला आहे. सुरवातीला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला झटका...

‘टुटे मन से कोई खडा नही होता’ शिवसेनेचा फडणवीसांना वाजपेयींच्या कवितेतून टोला

  मुंबई,02 जून : '‘काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणारे नवे युग आता तिथे अवतरले आहे. त्यामुळेच ‘छोटे मन’ आणि ‘मोठे मन’ यांच्या व्याख्या...

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

अन्विताला आवडत नाही 15 जून ही तारीख; काय नेमकं कारण?

मुंबई 1 जुलै: मराठीमधील एक गोड आणि हसतमुख अभिनेत्री म्हणून (Anvita Phaltankar) अन्विता फलटणकर कडे पाहिलं जातं. अन्वितचा आज वाढदिवस आहे. सगळ्यांची लाडकी...