Saturday, November 27, 2021
Home करमणूक Super Dancer 4 च्या सेटवर शिल्पा शेट्टीचं जल्लोषात स्वागत, अभिनेत्री झाली भावुक

Super Dancer 4 च्या सेटवर शिल्पा शेट्टीचं जल्लोषात स्वागत, अभिनेत्री झाली भावुक


हायलाइट्स:

  • तीन आठवड्याच्या गॅपनंतर शिल्पा शेट्टीने केले चित्रीकरण
  • सुपर डान्सर ४ च्या चित्रीकरणात शिल्पा झाली सहभागी
  • सेटवर सर्वांनी आपलेपणाने स्वागत केल्याने शिल्पा झाली भावुक

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणावरून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा ला अटक करण्यात आली. राजला अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टीने सुपर डान्सर ४ या कार्यक्रमातून काही दिवस ब्रेक घेतला होता. परंतु शिल्पा पुन्हा कार्यक्रमात सहभागी झाली असून आगामी भागाच्या चित्रीकरणातही ती सहभागी झाली आहे.

सुपर डान्सर हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर सुरू झाल्यापासून शिल्पा या कार्यक्रमात परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. शिल्पाच्या नवऱ्याला राजला अटक झाल्यानंतर ती काही आठवडे या कार्यक्रमापासून लांब होती. ती कार्यक्रमात सहभागी होणार की नाही अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती, परंतु ती लवकरच कार्यक्रमात परतणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितल्यावर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.


त्यानंतर लगेचच सुपर डान्सर ४ कार्यक्रमाच्या चित्रीकरणामध्ये शिल्पा शेट्टी सहभागी झाली. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये व्हॅनिटीमधून शिल्पा उतरताना दिसते. तिने साडी नेसलेली असून ती चित्रीकरणासाठी जाताना दिसत आहे. याआधी व्हॅनिटीमधून उतरून सेटवर चित्रीकरणासाठी जाताना शिल्पा तिथे असलेल्या फोटोग्राफर्सना पोझ द्यायची, त्यांच्याशी संवाद साधायची. परंतु आज मात्र ती कुणाशीही न बोलता सेटच्या दिशेने गेली. तिच्या चेहऱ्यावर एक उदासी दिसत होती.


सुपर डान्सर ४ या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीसोबत अनुराग बासू आणि गीता कपूर हे परीक्षक म्हणून काम करत आहेत. सेटवर शिल्पा पोहोचल्यावर परीक्षकांनी आणि सर्व स्पर्धकांनी शिल्पाचे उत्साहात स्वागत केले. शिल्पा परतल्यामुळे सेटवरील वातावरण भावुक झाले होते. इतकेच नाही तर सर्वांनी जो आपलेपणा, प्रेम दाखवले ते पाहून शिल्पाही काही काळ हळवी झाली होती.

राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिल्पा शेट्टीचे सुपर डान्सर ४ कार्यक्रमाचे चित्रीकरण होते. परंतु त्यात ती सहभागी झाली नाही. त्यानंतर तीन आठवडे या कार्यक्रमापासून ती दूर होती.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Super #Dancer #चय #सटवर #शलप #शटटच #जललषत #सवगत #अभनतर #झल #भवक

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Most Popular

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

प्रशांत किशोर यांच्या बंगळुरू भेटीची चर्चा; दक्षिणेत कुणासाठी सुरू मोर्चेबांधणी?

शरद शर्मा कलागारू बंगळुरू, 26 नोव्हेंबर: राजकीय रणनीतिकार (Political strategist) म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नुकतीच कर्नाटकमधल्या (karnataka) काही कॉंग्रेस नेत्यांची...

सिंधू उपांत्य फेरीत; सात्त्विक-चिराग यांचीही विजयी घोडदौड

साईप्रणीत पराभूत इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅर्डंमटनपटूंनी शुक्रवारी इंडोनेशिया खुल्या बॅर्डंमटन...

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; मनप्रीतकडे भारताचे नेतृत्व

पुढील महिन्यात ढाका येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंगकडे...

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...