Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल Stress मुळे मुलांमध्ये दिसतात ‘ही’ लक्षणं; Online अभ्यासामुळे होतोय वाईट परिणाम

Stress मुळे मुलांमध्ये दिसतात ‘ही’ लक्षणं; Online अभ्यासामुळे होतोय वाईट परिणाम


दिल्ली, 03 ऑगस्ट: कोरोनाची लाटेच्या (Third Wave of Corona) भीतीने ऑगस्ट महिन्यातही अजून शाळा सुरू झालेल्या(No School)नाहीत. त्यामुळे मुलांच्या ऑनलाईन शाळा (Online School) सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय कोरोनामुळे मुलांना घराबाहेर खेळायलाही जाता येत नाही. त्यामुळे त्यांचा जास्तीतजास्त वेळ घरी फोनवर किंवा लॅपटॉपवर जात आहे. त्यामुळे मुलांचे डोळे खराब होण्याची भीती पालकांच्या मनात निर्माण झाली आहे. मुलं लॅपटॉप,मोबाईल, कम्प्युटर यांचा जास्त प्रमाणात वापर करू लागलेत. एका रिपोर्टनुसार कोरोना काळामध्ये 28 करोड लोकांचे डोळे कमजोर झाले आहेत. दिवसातले 6 तास गॅझेट(Gadgets) वापरल्यामुळे डोळ्यांवर परिणाम (Effects on the Eyes) झालेला आहे. शाळा बंद असल्यामुळे मुलांना ऑनलाईन (Online Study) अभ्यास करावा लागतो. त्यामुळेच मोबाईल आणि कम्प्युटरचा वापर मुलंही जास्त प्रमाणात करतात. 10 ते 15 वर्षांच्या मुलांचे डोळे खराब व्हायला लागले आहेत.
मुलांचं स्क्रीन टाइम वाढल्यामुळे त्याचे वाईट परिणाम देखील त्यांच्या आरोग्यावर व्हायला लागलेत. याशिवाय कोरोना काळामध्ये बाहेर खेळायला जाणं बंद झाल्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी थांबलेल्या आहेत. अशा वेळेस मुलं वेळ घालवण्यासाठी मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे मुलांमध्ये काही तक्रारी वाढायला लागल्या आहेत.
(हेल्दी असलं तरी कच्चं सॅलडही आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक कारण…)
झोप येत नाही
ऑनलाईन अभ्यासामुळे मुलांची झोप कमी झालेले आहे. डोळ्यांवर परिणाम झाल्यामुळे रात्री गाढ झोप लागत नाही. मुलं झोपेतही चुळबूळ करत राहतात. यामुळे मुलांमध्ये स्ट्रेस लेव्हल वाढायला लागली आहे.
पोट दुखी
कोरोना काळांमध्ये मुलांमध्ये पोट दुखीची समस्या वाढायला लागलेली आहे. ताण वाढल्यामुळे त्याचा परिणाम पचन व्यवस्थेवर देखील दिसून येतो आहे. महत्त्वाचं म्हणजे पोटदुखीची तक्रार असणार्‍या मुलांमध्ये कोणत्याही आजाराची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे मुलं पोटदुखीच्या त्रासाची बद्दल तक्रार करत असतील तर, त्याकडे दुर्लक्ष करू नका.
(रोज 1 ग्लास मोसंबीचा रस घेतल्याने हाडं होतील मजबूत, निरोगी डोळे आणि..वाचा फायदे)
चिडचिडेपणा
मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढायला आला आहे. मुलांच्या स्वभावामध्ये बदल दिसत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करू नका. सतत डिव्हाईसचा वापर करत असल्यामुळे मुलांच्या स्वभावामध्ये बदल दिसायला लागलेत.
गप्प राहणे
मुलांची मानसिक स्थिती आता बदलायला लागलेली आहे. चिडचिड करण्याऐवजी मुलं खुपच गप्प बसत असतील तर हा त्यांच्यावर होत असलेला ऑनलाइन अभ्यासाचा परिणाम समजावा. मुलं सतत मोबाइल लॅपटॉप किंवा कम्प्युटर समोर बसत असतील तर, पालकांनी रागावल्यावर मुलं गप्प बसायला लागतात. मात्र मुलांच्या स्वभावातला हा बदल दुर्लक्ष करण्यासारखा नाहीये.
(अरे देवा! अश्रूंमधूनही पसरू शकतो कोरोनाव्हायरस; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर)
सतत बाथरमला जाणं
मुल सतत लघवीला किंवा शौचाला जात असेल तर याचा अर्थ तो योग्य आहार घेत नाही असा होतो. पण, चांगला आहार घेऊन सुद्धा मुलं शौचासंबंधित तक्रारी करत असतील तर, हा मानसिक आजाराचा परिणाम असू शकतो. अशा वेळेस मुलांना भरपूर पाणी पिण्यासाठी प्रोत्साहित करा आणि गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(बाळाचं पोट भरेल इतकं दूध येण्यासाठी; ‘या’ पद्धतीने करा ‘Breast Feeding’)
याशिवाय ऑनलाईन अभ्यास करताना मुलांना थोड्याथोड्या वेळाने स्कीनवरून डोळे बाजूला घेण्याची सवय लावा. डोळ्याचे व्यायाम नियमितपणे करणं खुप महत्वाचं आहे. कोरोनामुळे मुलांना बाहेर खेळ्यास परवानगी ​​नसली तरी, आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस कमीतकमी थोड्या वेळासाठी तरी त्यांना बाहेर न्या.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Stress #मळ #मलमधय #दसतत #ह #लकषण #Online #अभयसमळ #हतय #वईट #परणम

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

रोज किती पावलं चाललात तर तुम्ही फिट राहू शकता? त्यामागचं गणित माहितीये?

चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Amit Thackeray : अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर, मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

<p><strong>Amit Thackeray :</strong> अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहे.&nbsp; मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं.&nbsp; अमित ठाकरेंवर पक्षसंघटनेची मोठी जबाबदारी आहे.&nbsp; &nbsp;पुण्यातील...

मुंबईकरांनो सावधान! शहरात एका दिवसात 79% कोरोनाचे रुग्ण वाढले

 आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

श्रावणात वरदलक्ष्मी व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे...

Urvashi Rautela : ‘परी म्हणू की सुंदरा…’, अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा मनमोहक अंदाज

Urvashi Rautela : 'परी म्हणू की सुंदरा...', अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा मनमोहक अंदाज अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...