Sunday, January 16, 2022
Home करमणूक Stop It डॅड' फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL


मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक गंभीर आरोपांमुळे आर्यन खान   (Arbaz Khan)  मोठया चर्चेत होता. इतकंच नव्हे तर यावेळी आर्यन खानचा मित्र असणारा अरबाज मर्चंट हा देखील चर्चेत आला होता. सध्या हे दोघेही जामीनावर बाहेर आहेत. नुकताच अरबाज मर्चंटचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आणि हा व्हिडीओ   (Viral Video)  आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

बॉलिवूड स्टार किड्सवर सगळ्यांचं लक्ष लागून असतं. अशातच बॉलिवूडचा किंग समजल्या जाणाऱ्या शाहरुख खानच्या मुलांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते फारच उत्सुक असतात. गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणामुळे प्रचंड चर्चेत आहे. ड्रग्स घेण्यापासून ते अनेक गंभीर आरोप आर्यन कांगांवर लावण्यात आले होते. यावेळी आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट हादेखील या प्रकरणात विशेष चर्चेत होता. नुकताच अरबाज मर्चंटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स प्रचंड खिल्ली उडवत आहेत.पिंकविलाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्यन खान प्रमाणेच अरबाज मर्चंट हादेखील सध्या जामीनावर बाहेर आहे. मात्र त्यांना अनेक प्रोटोकॉल देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना मुंबई आणि भारत सोडता येत नाही. शिवाय त्यांनी सांगितलेल्या डेटवर एनसीबी कार्यालयात हजेरी लावणं महत्वाचं आहे. अशातच काल अरबाज आणि आर्यन खान एनसीबी कार्यालयात पोहोचले होते. दरम्यान कार्यालयातून बाहेर येताना एक मजेशीर प्रसंग घडला. यावेळी अरबाज मर्चंट आपल्या वडिलांसोबत कार्यालयातून बाहेर आला. बाहेर येताच त्याला पापाराझींनी घेरलं. त्यांना चुकवून तो जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याच्या वडिलांनी एकदम आनंदी होत त्याला ओढून फोटोसाठी पोझ देण्यास सांगितलं. हे पाहून अरबाज फारच ऑकर्ड झाला. त्याने चक्क आपल्या डोक्यावर हात मारलं. मात्र तरीसुद्धा त्याच्या वडिलांना फोटोच काढायचा होता. त्यामुळे अरबाज वडिलांवर खेकसला आणि त्याने ‘स्टॉपिड डॅड …’म्हणत तेथून पळ काढला.
(हे वाचा:रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; ‘सर्कस’ ,’फोन भूत’ एकाच दिवशी होणार रिलीज )
अरबाज आणि त्याच्या वडिलांचा हा मजेशीर प्रसंग कॅमेरात स्पष्टपणे कैद झाला. हा पसंग पाहून पापाराझींनासुद्धा हसू आवरलं नाही. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर पोस्ट होताच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यावर युजर्स वेगळंवेगळ्या कमेंट्स देत आहेत. अनेक लोक मजेशीर कमेंट्स करून या प्रसंगाची खिल्ली उडवत आहेत. काहींनी तर म्हटलं आहे, मुलाचा अपमान कस करावा हे अरबाजच्या वडिलांकडून शिकावं सोबतच त्यांनाही हसणारे इमोजी शेअर केले आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Stop #डड #फटवडय #बपवर #खकसल #आरयन #खनच #मतर #VIDEO #हतय #VIRAL

RELATED ARTICLES

लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी...

Fact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा

मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. सध्या कोरोना विरूद्धच्या लढ्यात लस हे सर्वात प्रभावी शस्त्र मानलं जातंय. मात्र मुंबईत...

जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे नाहीत

मुंबई, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोना काळात जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं आहे. जगभरात लोक...

Most Popular

‘डीआरएस’चा वाद आफ्रिकेसाठी लाभदायी -एल्गर

केप टाऊन : निर्णायक तिसऱ्या कसोटी सामन्यात पंच निर्णय आढावा प्रणालीने (डीआरएस) साथ न दिल्यामुळे भारतीय खेळाडूंचे लक्ष भरकटले आणि तेथूनच आफ्रिकेने वेगाने...

लसीचे दोन डोस घेतले असतील तरच लोणावळ्यासह मावळ तालुक्यात मिळणार प्रवेश, अन्यथा….!

Pune Corona Restrictions : पुण्यातील (Pune) प्रसिद्ध पर्यटनस्थळी म्हणजे लोणावळ्यात (Lonavala) लसीचे दोन डोस घेतले असतील तरच प्रवेश...

विवाहबाह्य संबंधांमुळे महिलेला 100 चाबकाचे फटके, इंडोनेशियामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन

इंडोनेशिया : विवाहबाह्य संबंध ठेवल्याबद्दल इंडोनेशियामध्ये एका महिलेला 100 चाबकाचे फटके मारण्यात आले आहेत. तर तिच्या पुरुष साथीदाराला...

जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे नाहीत

मुंबई, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोना काळात जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं आहे. जगभरात लोक...

‘रंजिश ही सही’….

‘‘ जेव्हा मी ही संहिता वाचली त्याचक्षणी माझ्या लक्षात आले की, माझ्यासाठी ही कथा समजायला फार अवघड नाही. || गायत्री हसबनीस ‘८३’ सिनेमाच्या...

Pune : पुण्यात MPSC करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती

By : abp majha web team | Updated : 16 Jan 2022 08:05 AM (IST) पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने विषप्राशन करुन आत्महत्या...