शेअर बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणुकदारांनी मार्केटचा संपूर्ण अभ्यास आणि धैर्याने काम करणं गरजेचं असल्याचं मार्केट एक्सपर्ट सांगतात. परंतु प्रत्येकाकडे शेअर मार्केटची समज असतेच असं नाही. अनेकजण एकमेकांना पाहून कोणत्याही स्टॉकमध्ये पैसे लावतात आणि नंतर पश्चताप करण्याची वेळ येते. पश्चतापाची वेळ येऊ नये, यासाठी शेअर मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं ठरतं. हा अभ्यास तुम्ही घरबसल्याही करू शकता. अशात स्टॉकडॅडी (StockDaddy) App फायद्याचं ठरू शकतं.
हे वाचा – गुंतवणूकदारांची ‘या’ शेअरमुळे लॉटरी, वर्षभरात 1 लाखांची गुंतवणूक बनली 23 लाख
काय आहे StockDaddy App?
StockDaddy हे स्टॉक ट्रेडिंग लर्निंग App आहे, जे नव्या गुंतवणुकदारांना शेअर बाजाराचं मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण समजून घेण्यास मदत करतं. StockDaddy App लोकांना पारंपरिक व्यवसायांव्यतिरिक्त इतर व्यवसायांमधून पैसे कमावण्यास आणि त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीत मूल्य जोडण्यात सक्षम करतं. EaseMyTrade द्वारे समर्थित अत्याधुनिक स्मार्ट सुविधांयुक्त असलेलं StockDaddy App हा एक ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, जो नव्या गुंतवणुकदारांना बाजारातील बारकाव्यांसह, स्टॉक मार्केटचं ज्ञान वाढवण्यास, मार्केट कौशल्य सुधारण्यास मदत करतं.
हे वाचा – या आठवड्यात ‘छप्परफाड’ रिटर्न! या TOP5 स्टॉकनी दिला 50% पेक्षा जास्त परतावा
StockDaddy App EaseMyTrade चे संस्थापक आलोक कुमार यांनी तयार केलं आहे. शेअर बाजारात गुंतवणूक आणि व्यवसायाबाबत लोकांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी हे App सुरू केलं.
StockDaddy App वर दोन प्रकार आहे. एक स्टॉक मार्केट फॉर बिगिनर्स आणि दुसरं स्टॉक मार्केट मास्टरी. या App वर लोकांना ऑनलाइन क्लासची सुविधा दिली जाते, ज्यांना यात अधिक माहिती, ज्ञान मिळवायचं आहे. आता या App वर ऑफलाइन कोर्सची सुविधादेखील लवकरच सुरू केली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Stock #Marketमधय #टरडग #करण #हईल #सपय #Mobile #Appवर #मळतल #Investment #Tips