Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या ST Bus Stirke : आझाद मैदानातून कर्मचाऱ्यांना हटवणार? पोलिसांचा ताफा पोहोचला

ST Bus Stirke : आझाद मैदानातून कर्मचाऱ्यांना हटवणार? पोलिसांचा ताफा पोहोचला


संध्याकाळपासून आझाद मैदानावर पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला. पाणी मारा करणारं वरुण वाहन आणि दंगा नियंत्रण पथक दाखल झाले आहे.

संध्याकाळपासून आझाद मैदानावर पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला. पाणी मारा करणारं वरुण वाहन आणि दंगा नियंत्रण पथक दाखल झाले आहे.

संध्याकाळपासून आझाद मैदानावर पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला. पाणी मारा करणारं वरुण वाहन आणि दंगा नियंत्रण पथक दाखल झाले आहे.

मुंबई, 20 डिसेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये (mva government) विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानावर (mumbai azad maidan) आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे (ST bus Strike) आंदोलन चिरडण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचारी संघटनेनं माघार घेतल्यानंतर आझाद मैदानावर पोलीस ताफा दाखल झाला आहे. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे.


एसटी बस कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आज हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. त्यानंतर संध्याकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत संप पुकारणाऱ्या संघटनेनं बैठक घेऊन संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर संध्याकाळपासून आझाद मैदानावर पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला.  पाणी मारा करणारं वरुण वाहन आणि दंगा नियंत्रण पथक दाखल झाले आहे. त्याचबरोबर डोंगरी, जे जे आणि कफपरेड पोलीस ठाण्याची अतिरिक्त कुमक पोहोचली आहे.  आंदोलकांना घोषणा न देण्याची सूचना पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, एसटी कर्मचारी संघटनेने 21 ऑक्टोबर 2021 रोजी राज्य सरकारला सर्वात आधी संपाची नोटीस दिली होती त्या संघटनेचे नेते अजय गुजर यांनी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. गुजर यांची आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत मंत्रालयात जवळपास पाच तास चर्चा झाली. या चर्चेनंतर गुजर यांनी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली. तसेच आपण संपकरी कर्मचाऱ्यांना आवाहन करु, आझाद मैदानात जाऊ, असंही ते म्हणाले.

‘विलीनीकरणाच्या निर्णयाला वेळ लागणार’

तरदुसरीकडे,  एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employees) याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) सुनावणी झाली. या सुनावणीत त्रिसदस्यीय समितीने आपला प्राथमिक अहवाल कोर्टात सादर केला. या अहावालात एसटीचं राज्य शासनात विलीनीकरणाच्या विषयावर भूमिका मांडण्यात आली होती. विलीनीकरणाचा मुद्दा हा थोडा अवघड आहे. त्याला वेळ लागेल, असं अहवालात नमूद करण्यात आलं होतं.

कर्मचाऱ्यांना मिळणार नोटीसा!

दरम्यान, महामंडळाचे वकील जी एस हेगडे यांनी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याची मागणी केली आहे. ‘२२ डिसेंबरला राज्यसरकार ३४३ कर्मचाऱ्यांना कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावणार आहे. आम्हाला संपूर्ण अहवाल बनवण्यासाठी ३ फेब्रुवारीपर्यतचा वेळ लागणार असून या तारखेपर्यंत अहवाल पूर्ण होईल अशी सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे, अशी माहिती हेगडे यांनी दिली.

तसंच, गुणरत्न सदावर्ते काहीही म्हणत असले तरी कामावर न येणे,  कामावर जाण्यापासून परावृत्त करणे, दुखवटा किंवा अन्यकाही कारणं सांगितली तरी तो न्यायालयाचा  अवमान आहे. तसंच आज ४० हजार कर्मचाऱ्यांचे अर्ज सदावर्ते यांनी सादर केले तसंच भविष्यात आणखी ३० हजार कर्मचाऱ्यांचे अर्ज दाखल करतो, असे सांगितले आहे. त्यामुळे या सर्वांनी हे मान्य केलं आहे की आम्ही कामावर नाहीत असं, त्यामुळे या सर्वांनाही न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावावी अशी आम्ही मागणी करणार आहोत, असंही हेगडे यांनी सांगितलं.

त्यामुळे सुरुवातीचे 343 आणि नंतरचे सुमारे 80 हजार कर्मचारी अशा सर्वांवर न्यायालयाने अवमान केल्याप्रकरणी नोटिसा बजावल्या जाव्या अशी आमची मागणी असेल असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा लढा आणखी चिघळणार असे दिसून येत आहे.

Published by:sachin Salve

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Bus #Stirke #आझद #मदनतन #करमचऱयन #हटवणर #पलसच #तफ #पहचल

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

आपला मेंदू शरीरापेक्षा जास्त गरम असतो; पुरुष की महिला कोणाचं डोकं जास्त तापतं?

मुंबई, 6 जुलै : निसर्गाने निर्माण केलेली जगातील सर्वात गुंतागुंतीची गोष्ट बहुधा मानवी मेंदू (Human Brain) असेल. यावर अनेक सखोल संशोधन करूनही आत्तापर्यंत...

पीटी उषा, इलयाराजा यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर निवड

Rajya Sabha: राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून मोदी सरकारच्या शिफारशीने चार नावं जाहीर झाली आहेत. ही चारही...

Pune News: पुण्याला पावसाचा फटका! 5 तासात 13 झाडे कोसळली; कोणतीही जिवितहानी नाही

Pune News:  पुण्यात सलग दोन दिवसांपासून पावसाने माध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आणि बळीराजाला...

दत्तक पालक व्हा! संतोष जुवेकर का म्हणतोय असं? पोस्ट होतेय Viral!

मुंबई 5 जुलै: कलाकार कितीही कामात व्यस्त असले तरी त्यांच्या संवेदना कायमच जागरूक असतात. अगदी महामारी असो किंवा एखादी मदतीची हाक असो कलाकार...

India vs England Test Series Joe Root childhood photo with Michael Vaughan goes viral vkk 95

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एजबस्टन कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात जो रूटने आक्रमक खेळी करत शतक झळकावले. हे त्याच्या कारकिर्दीतील २८वे कसोटी शतक...