Saturday, July 2, 2022
Home टेक-गॅजेट Smartphone Offers: बंपर ऑफर! अवघ्या १४ हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय ५०MP कॅमेऱ्यासह येणारा...

Smartphone Offers: बंपर ऑफर! अवघ्या १४ हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय ५०MP कॅमेऱ्यासह येणारा स्मार्टफोन, पाहा डिटेल्स


नवी दिल्ली : Discount on iQOO Smartphone: भारतीय स्मार्टफोन बाजार मिड-रेंज हँडसेट्सने भरलेला आहे. १५ ते २० हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारे असंख्य फोन्स बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही देखील १५ हजार रुपयांच्या बजेटमधील नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच एका चांगल्या हँडसेटची माहिती देत आहोत. या बजेटमध्ये iQOO Z6 44W स्मार्टफोन चांगला पर्याय ठरेल. ई-कॉमर्स साइट Amazon India वरून या फोनला तुम्ही आकर्षक ऑफर आणि डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फोनच्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,४९९ रुपये आहे. फोनला खरेदी करताना ICICI बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास १ हजार रुपये फ्लॅट डिस्काउंटचा फायदा मिळेल. यासोबतच, फोनवर एक्सचेंज ऑफर अंतर्गत १०,०५० रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.

वाचा: Email Scams: इंटरनेटच्या जगातील सर्वात मोठा स्कॅम, लोकांनी गमावले तब्बल १८७ अब्ज रुपये; पाहा कसे?

iQOO Z6 44W चे फीचर आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO Z6 44W स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंच फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४००x१०८० पिक्सल आहे. हा डिस्प्ले १८० हर्ट्ज टच सँपलिंग रेटसह येतो. कंपनीचा हा फोन ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. यात स्नॅपड्रॅगन ६८० चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात तुम्हाला ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह २ मेगापिक्सलचा मॅक्रो आणि २ मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरा दिला आहे.

वाचा: Movies Download Website: ‘या’ ५ वेबसाइट्सवरून मोफत डाउनलोड करता येईल लोकप्रिय चित्रपट-सीरिज, एकही रुपये खर्च नाही; पाहा लिस्ट

iQOO च्या या फोनमध्ये सेल्फीसाठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनला रेव्हेन ब्लॅक आणि ल्यूमिना ब्लू रंगात खरेदी करू शकता. यात पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. ही बॅटरी ४४ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ ५ सह अनेक स्टँडर्ड पर्याय मिळतील. फोन अँड्राइड १२ आधारित Funtouch OS वर काम करतो.

वाचा: iPhone 14 खरेदी करायचाय? लाँचआधीच जाणून घ्या संभाव्य फीचर्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Smartphone #Offers #बपर #ऑफर #अवघय #१४ #हजरचय #बजटमधय #मळतय #५०MP #कमऱयसह #यणर #समरटफन #पह #डटलस

RELATED ARTICLES

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे...

Most Popular

भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : भारतीय महिला संघाची श्रीलंकेवर सरशी

पालेकेले : दीप्ती शर्माची (२५ धावांत ३ बळी आणि नाबाद २२ धावा) अष्टपैलू कामगिरी व कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (६३ चेंडूंत ४४ धावा) संयमी...

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर...

अन्विताला आवडत नाही 15 जून ही तारीख; काय नेमकं कारण?

मुंबई 1 जुलै: मराठीमधील एक गोड आणि हसतमुख अभिनेत्री म्हणून (Anvita Phaltankar) अन्विता फलटणकर कडे पाहिलं जातं. अन्वितचा आज वाढदिवस आहे. सगळ्यांची लाडकी...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

सैफचा लेक नाही, तर पलक तिवारी ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट

लेकीच्या अफेअरबद्दल श्वेता तिवारीला कल्पना? इब्राहीम खान नाही, तर 'या' अभिनेत्याला करते डेट   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

शिंदे सरकारमधील 5 जणांचा पुढील आठवड्यात शपथविधी, चंद्रकांतदादांना हवं महसूल खातं

मुंबई, 02 जुलै :  एकनाथ शिंदे (eknath shinde government) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची हालचाल सुरू झाली आहे. लवकरच पुढील आठवड्यात...