Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती


नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत खाते उघडायचे असेल, केवायसी करण्यासाठी, रेशन कार्ड बनवण्यासाठी, सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ते नवीन सिम कार्ड घेण्यासाठी देखील तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. मात्र, तुमच्या सिम कार्डचा दुरुपयोग देखील होऊ शकतो. आधार कार्ड वापरून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. खासकरून, आधार कार्डवर सिम कार्ड घेतले जातात व याबाबत आधार कार्डधारकाला माहिती देखील नसते. तुमच्या आधार कार्डवर देखील किती नंबर जारी करण्यात आले आहेत, हे जाणून घेण्यासाठी सोपी प्रोसेस उपलब्ध आहे. या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.

वाचा: Flipkart Sale: फ्लिपकार्टवर सुरू झाला खास सेल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ८०% डिस्काउंट; अवघ्या ९९ रुपयात मिळतील अनेक वस्तू

घरबसल्या मिळेल तुमच्या आधारवर सुरू असलेल्या सिम कार्डची माहिती

  • एक आधार कार्डवर तुम्ही १८ सिम कार्ड घेऊ शकता. टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायनुसार, एका आधारवर नागरिक १८ सिम कार्ड घेऊ शकतात.
  • तुमच्या आधारवर किती सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह आहेत, हे जाणून घेण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. तसेच, सर्वात प्रथम तुम्हाला यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जावे लागेल.
  • येथे तुम्हाला ‘गेट आधार’वर जावून ‘डाउनलोड आधार’ पर्यायावर क्लिक करायचे आहे. आता व्ह्यू मोर या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला ‘आधार ऑनलाइन सर्विस’वर जायचे आहे. त्यानंतर ‘Aadhaar Authentication History’ वर क्लिक करता. पुढे Where can a resident chech/ Aadhaar Authentication History वर जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर सेंड ओटीपी’वर क्लिक करा. आता ‘AuthenticationType’वर ऑल निवडून ज्या तारखेची माहिती हवी आहे, ती निवडा. आता तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी भरा. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आधारवर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या सिम कार्डची माहिती मिळेल. तुम्हाला माहित नसलेला मोबाइल नंबर अ‍ॅक्टिव्ह असल्यास ट्रायकडे बंद करण्यासाठी तक्रार देखील करू शकता.
  • याशिवाय, तुम्ही tafcop.dgtelecom.gov.in वर जावून देखील याबाबत माहिती घेऊ शकता. मात्र, ही सुविधा ठराविक राज्यातच उपलब्ध आहे.

वाचा: Recharge Plan: युजर्सची मजा ! या प्लानमध्ये ३ महिने Disney+ Hotstar फ्री, सोबत ८ GB डेटा सुद्धा, किंमत खूपच कमी

वाचा: Infinix Smartphones: Note 12 लाँच करण्याच्या तयारीत Infinix , पाहा Flipkart वर कधी सुरु होणार सेलअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Sim #Card #तमचय #नववर #कत #जणन #घतल #आह #सम #करड #य #सपय #परससन #मळल #सपरण #महत

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

शिंदे-फडणवीसांची वक्तव्ये म्हणजे बाजारातील ‘उधारीचा माल’, ‘सामना’तून पुन्हा टीका

मुंबई, 6 जुलै : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यादिवसापासून शिंदे-शिवसेना यांच्यात शाब्दिक यु्द्ध सुरु झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...

Innovation: फर्निचर आहे की जादू! व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल

आपल्याला कायम वाटत असतं आपलं घर प्रशस्त असलं पाहीजे. तीन चार खोल्यांसह घरात डायनिंग टेबल, फर्निचर असायला हवं. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

आपला मेंदू शरीरापेक्षा जास्त गरम असतो; पुरुष की महिला कोणाचं डोकं जास्त तापतं?

मुंबई, 6 जुलै : निसर्गाने निर्माण केलेली जगातील सर्वात गुंतागुंतीची गोष्ट बहुधा मानवी मेंदू (Human Brain) असेल. यावर अनेक सखोल संशोधन करूनही आत्तापर्यंत...

Vastu Tips: कासवाची अंगठी कधी चुकून पण अशी नाही घालायची; नियम समजून घ्या

मुंबई, 06 जुलै : अनेकांना अंगठी घालण्याची आवड असते. काही लोक आपल्या राशीनुसार अंगठी परिधान करतात तर काहींना सोन्या-चांदीच्या अंगठ्या घालायला आवडतात. सध्या...

अंडाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी पुरूषांनी लाइफस्टाइलमध्ये करावेत ६ महत्वाचे बदल

अंडाशयातील कॅन्सर म्हणजे टेस्टिक्युलर कॅन्सर पुरूषांशी संबंधीत एक गंभीर आजार आहे. हा आजार १५ ते ३५ वर्षातील वयोगटात पाहायला मिळतो. टेस्टिक्युलर कॅन्सरला वृषण...

बेस्टच ! सब्सक्रिप्शन शिवाय Free मध्ये घेता येणार Netflix चा आनंद, लगेच पाहा हे जिओचे भन्नाट ५ प्लान्स

Free Netflix: नेटफ्लिक्स चे फॅन असाल आणि एकही शो किंवा मुव्ही मिस करत नसाल तर, तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे. नेटफ्लिक्स अनेक...