Saturday, August 13, 2022
Home टेक-गॅजेट SIM वेरिफिकेशनसाठी मागितले 11 रुपये, पण डॉक्टरच्या खात्यातून तब्बल 6 लाख गायब;...

SIM वेरिफिकेशनसाठी मागितले 11 रुपये, पण डॉक्टरच्या खात्यातून तब्बल 6 लाख गायब; अशी झाली फसवणूक


भोपाळ, 2 ऑगस्ट : वाढत्या डिजीटल काळात ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud), सायबर क्राईमच्या (Cyber Crime) संख्येतही मोठी वाढ झाली आहे. OTP, KYC, SIM card अशा अनेक कारणांनी आतापर्यंत अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. फसवणुकीचा असाच एक प्रकार मध्यप्रदेशातील रीवामध्ये समोर आला असून केवळ 11 रुपयांच्या नावाने एका डॉक्टरच्या खात्यातून फ्रॉड करणाऱ्यांनी तब्बल 6 लाखांची रक्कम उडवली आहे.

SIM कार्ड वेरिफिकेशनच्या (SIM Card Verification) नावाने डॉक्टरला मोठा गंडा घालण्यात आला आहे. सायबर क्रिमिनल्सने एका रिटायर्ड डॉक्टरला निशाणा करुन त्यांची फसवणूक केली आहे. 18 जुलै रोजी फ्रॉड करणाऱ्या फ्रॉडस्टर्सनी डॉक्टरांना कॉल करुन त्यांचं सिम कार्ड वेरिफाय करण्याबाबत सांगितलं. सिम कार्ड वेरिफाय न केल्यास, 24 तासांच्या आत सिम बंद होणार असल्याची खोटी माहिती त्यांना दिली.

वेरिफिकेशनच्या नावाखाली स्कॅमर्सनी 11 रुपये नेट बँकिंगद्वारे मागितले. फ्रॉडस्टर्सच्या जाळ्यात अडकून डॉक्टरांनी आपल्या SBI खात्यातून 11 रुपये ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर केल्याच्या काही वेळातच डॉक्टरांच्या मोबाईलवर एका मागोमाग एक पैसे कट झाल्याचे 15 मेसेज आले. या मेसेजमधून त्यांच्या बँक खात्यातून 6 लाख 423 रुपये उडाल्याचं समजलं.

Mobile Phone चोरी झाल्यास आता सरकारच करणार मदत, करावं लागेल हे एक काम

डॉक्टरांनी बँकेत जाऊन संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली आणि पोलिसांतही तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित डॉक्टरने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. ज्या नंबरवरुन डॉक्टरांना कॉल आला होता, त्या फोनचं लोकेशन झारखंडमधील असल्याचं समोर आलं. लोकेशननुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

VI युजर्ससाठी कंपनीकडून फ्रॉड अलर्ट; जाणून घ्या यापासून कसा कराल बचाव

आरोपींनाही पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपलं लोकेशन बदलण्यास सुरुवात केली. परंतु पोलिसांनी एका ठिकाणी छापेमारी करत स्कॉर्पियो कार ताब्यात घेतली आहे. या गाडीत एक मोबाईल मिळाला असून याच मोबाईलवरुन त्यांनी डॉक्टरांना कॉल केला होता. या मोबाईलमधील सिम कार्डच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#SIM #वरफकशनसठ #मगतल #रपय #पण #डकटरचय #खतयतन #तबबल #लख #गयब #अश #झल #फसवणक

RELATED ARTICLES

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

Most Popular

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे...

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...

पायांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसली तर सावधान; Cholesterol वाढल्याचे संकेत

ला जाणून घेऊया, कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यावर पायांमध्ये कोणती चिन्हे दिसतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...