Monday, July 4, 2022
Home विश्व Shocking! हनीमूनवर असताना नवऱ्याकडून झाली एक चूक; बायकोचा जागीच मृत्यू

Shocking! हनीमूनवर असताना नवऱ्याकडून झाली एक चूक; बायकोचा जागीच मृत्यू


कॅनबेरा, 23 जून : लग्न होताच कपलला प्रतीक्षा असते ती हनीमूनची. असंच उत्साहात हनीमूनला एक कपल गेलं. पण त्यांच्यासोबत भयंकर दुर्घटना घडली. हनीमूनवर असताना नवऱ्याकडून एक अशी चूक झाली, ज्यामुळे बायकोचा मृत्यू झाला. हनीमूनसाठी गेलेल्या नवविवाहितेचा दुर्दैवी अंत झाला. ऑस्ट्रेलियातील हे धक्कादायक प्रकरण आहे (Bride died on honeymoon).
सिडनीत राहणारी 29 वर्षांची मारिना मोर्गनचं 10 दिवसांपूर्वीच रॉबीसोबत लग्न झालं. त्यानंतर दोघंही हनीमूनसाठी क्वीसलँडला गेले. हॅमिल्टन आयलँडवर ते एका गोल्फ बग्गीतून फिरत होते. रॉबी बग्गी चालवत होता आणि मारिना त्याच्या शेजारी बसली. त्याचवेळी रॉबीकडून एक चूक झाली आणि त्याने मारिनाला कायमचं गमावलं.
व्हिट्संडे बाउलेवार्डवर बग्गी चालवताना रॉबीने अचानक यू-टर्न घेतला आणि बग्गी पलटली. त्यावेळी  एक डॉक्टर, ऑफ ड्युटी डेंटिस्ट आणि फायर फायटर त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी मारिनाला 35 मिनिटं सीपीआर दिला. तिला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले पण तिला वाचवता आलं नाही.
हे वाचा – VIDEO – अवघ्या 10 सेकंदावर होता मृत्यू; तरी ट्रॅकवर प्रवाशाला वाचवायला गेला रेल्वे कर्मचारी आणि…
मीडिया रिपोर्टनुसार पोलीस अँथोनी कोव्हा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, या घटनेत खतरनाक ड्रायव्हिंग केल्याचं किंवा हे कपल नशेत होतं, असे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. अशा गाड्या चालवण्याचा अनुभव नसल्याने ही दुर्घटना झाली असावी. गाडीची बॅटरी संपत होती आणि चार्जिंग पॉइंटपर्यंत पोहोचायचं असावं म्हणून त्यांनी यूटर्न घेतला असावा.  घाईत यू-टर्न घेण्यासाठी गाडी वळवली आणि ती उलटली. महिलेने सीट बेल्टही घातलं नव्हतं.
क्वीसलँड एम्ब्युलन्स सर्व्हिसचे ग्रीम मॅकइंटायर यांनी सांगितलं की, पॅरामेडिकल स्टाफ काही मिनिटांत तिथं पोहोचला. महिलेला हार्ट अटॅक आला होता. 35 मिनिटं तिला सीपीआ देण्यात आला पण तिला वाचवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Shocking #हनमनवर #असतन #नवऱयकडन #झल #एक #चक #बयकच #जगच #मतय

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

अभिनेत्री आश्विनी कासारने शेअर केला Sunday Motivational Video

मुंबई, 3 जुलै : छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे आश्विनी कासार(Ashwini kasar). आश्विनी सोशल मीडियावर (social...

Captain Miller Teaser : धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’चा टीझर आऊट

Captain Miller Teaser Out : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. धनुषच्या...

या ‘महाशक्ती’पुढे जनशक्तीही दुर्बल!

सचिन सावंत ‘भारतमाता की जय’ या घोषणेतील भारतमाता कोण आहे याचे उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिले होते. ते उत्तर होते भारतमाता म्हणजे भारतातील...

‘अशोक मामांनी जमिनीवर राहायला शिकवलं’, अलका कुबलांनी सांगितल्या अविस्मरणीय आठवणी

मुंबई 3 जुलै: अशोक सराफ (Ashok Saraf) यांची कारकीर्द आजच्या च नव्हे तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. अशोक मामांचा या वर्षी...

Aaditya Thackeray Full Speech Vidhan Sabha : तुमचं वजन फार वाढलंय, राजकारणाची पातळी फार खाली चाललीय

<p>Aaditya Thackeray Full Speech Vidhan Sabha : तुमचं वजन फार वाढलंय, राजकारणाची पातळी फार खाली चाललीय</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

एकनाथ शिंदे सरकारची उद्या बहुमत चाचणी, शिंदे गटाची सरशी, शिवसेनेचा व्हिप रद्द

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची उद्या परीक्षा आहे....