Monday, July 4, 2022
Home भारत shiv sena :'भाजपसोबत सत्तेत असताना सोन्याच्या ताटात जेवताना गोड लागलं', प्रीतम मुंडे,...

shiv sena :’भाजपसोबत सत्तेत असताना सोन्याच्या ताटात जेवताना गोड लागलं’, प्रीतम मुंडे, नवनीत राणांचा लोकसभेत हल्लाबोल


नवी दिल्लीः विरोधी पक्षांच्या आणि राज्यांच्या मागणीवरून केंद्र सरकारने १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक मांडले. यामुळे राज्यांना मागास समाजांना आणि जातींना आरक्षण देता येणार आहे. राज्यांची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. हा लोकशाहीचा सन्मान आहे. पण यावेळी सर्व चर्चा ही फिरून फिरून मराठा आरक्षणावर आणली जात आहे. ज्यांना मराठा आरक्षणाचा प्रचंड कळवळा आहे, त्यांनी हायकोर्टाने मराठा आरक्षण वैध ठरवल्यावर कोणी का बोललं नाही? आज जे विरोधात आणि त्यावेळी भाजपबरोबर सत्तेत होते (shiv sena) त्यांनीही कधी टीका केली नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपची भूमिका पटलेली नाही म्हणून एनडीएतून बाहेर पडतोय, असं कुणी बोललं नाही. त्यावेळी तुमचा हा कळवळा कुठे गेला होता? असा बोचरा प्रश्न भाजपच्या बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे ( pritam munde ) यांनी शिवसेनेचं नाव न घेता केला.

केंद्र सरकारला ओबीसींचा कळवळा आहे. हे आजच्या विधेयकावरून दिसतंय असं नाही. तर ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा मिळवण्याचा मुद्दा असेल, सवर्णांना १० टक्के आरक्षण असेल. ओबीसींना मेडिकलमध्ये आरक्षणाचा विषय असेल किंवा मंत्रिमंडळात ओबीसींना दिलेलंस्थान असेल यावर केंद्र सरकारने ठामपणे भूमिका मांडली आहे. केंद्र सरकारने पावलं उचलली आहेत फक्त भाषणं दिलेली नाहीत. आज मराठा आरक्षणावर मराठा तरुणाच्या त्याच्या शिक्षणासाठी किंवा त्याला नोकरी मिळवून देण्यासाठीची तळमळ आहे का? तर अजिबात नाही. कुठेतरी आपली वोटबँक निघून जाईल आणि आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवू शकलो नाही तर त्याचं खापर आपल्या डोक्यावर फुटेल की काय? या भीतीतून हा कळवळा येत नाही ना? असा सवाल करत डॉ. प्रीतम मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

ज्यांना आज काही ठरावीक समाजांचा कळवळा येतोय त्यांना ओबीसींशी काही देणंघेणं नाहीए का? त्यांच्याकडे फक्त वोटबँक म्हणूनच बघणार आहात का? राज्य सरकारने ओबीसी आरक्षण २७ टक्क्यांच्यावर गेलं अशी कबुली सुप्रीम कोर्टात दिली. मग ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे राजकीय आरक्षण काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? याचं उत्तर कोण देणार? तुम्ही एका ठराविक जाती किंवा समाजासाठी सरकार चालवताहेत का? ओबीसींशी तुमचं काहीच देणंघेणं नाहीए का? हा कळवळा आणि ही तळमळ ओबीसींवर होत असलेल्या अन्यायावेळी का दिसून येत नाही? असा प्रश्न प्रीतम मुंडेंनी यांनी केला. केंद्र सरकारची भूमिका ही सर्व समाजांना आणि जातींना एकत्रित पुढे घेऊन जाण्याची आहे आणि न्याय देण्याची आहे. यासाठी १० टक्के सवर्णांच्या आरक्षणांचा मुद्दा आपण उपस्थित केला, असं त्यांनी सांगितलं.

चंद्रपूरच्या काँग्रेस खासदारांमुळे लोकसभेत हशा पिकला; आधी नाही, मग हो म्हणाले

आमचं अस्तित्वात असलेलं ओबीसींचं राजकीय आरक्षण घालण्याचं पाप महाराष्ट्रातील सरकारने केलेलं आहे. ही आजची ओबीसींची स्थिती आहे. ओबीसी समाज तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही. कारण राज्य सरकार आपली भूमिका मांडण्यात अपयशी ठरलं आहे. फक्त ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा नाहीए तर एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या होत नाही. कारण आरक्षणावर निर्णय होत नाहीए. या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळेल? एमपीएसची आयोगावर ठराविक एका जातीचेच लोक नियुक्त केले जातात. इतर जातींकडे का दुर्लक्ष केलं जातं? या प्रश्नांची तुम्ही उकल केली तर तुम्ही खरंच वंचितांचे विषय उचलताय हे सिद्ध होईल, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.

‘आरक्षणासाठी समाजा-समाजाने रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडायची का?’

प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलायची हे काम विरोधकांकडून सुरू आहे. ५० टक्क्यांमध्ये आरक्षण बसवायचं तर कोणत्या जातीला किती आरक्षण द्यायचं? असा सवाल काहींनी केंद्र सरकारला केला. केंद्र सरकारने हे जर सांगितल तर आगामी काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला म्हणून १०० टक्के श्रेय हे केंद्र सरकारचं आहे, हे मान्य करायला तुम्ही तयार व्हाल का? असं असेल केंद्र सरकार वर्गीकरण करून देईल. चांगले निर्णय आमचे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तर ते केंद्राचे अपयश. अशी भूमिका असेल तर योग्य वेळ आल्यावर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असं खासदार डॉ. प्रीतम मुंडे म्हणाल्या.

supriya sule : ‘आरक्षणावर महाराष्ट्रातून दिशाभूल केली जातेय’, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

भाजपसोबत सोन्याच्या ताटात जेवलात तेव्हा सगळं गोड लागलंः नवनीत कौर राणा ( navneet kaur rana )

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून एकच कार्यक्रम सुरू आहे. चांगलं केलं तर ते आम्ही. वाईट झालं तर ते केंद्र सरकारने केलं, असं चाललं आहे. पण केंद्र सरकारने ओबीसींना न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर समाजालाही यातून न्याय मिळेल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी दोन दिवसांचं विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं. गेल्या ६० ते ७० वर्षांत ओबीसींना न्याय का दिला गेला नाही. सरकारने सोन्याचं ताट समोर ठेवलंय. पण त्यात लोणचं आहे ना, जेवण, असं शिवसेनेचे नेते म्हणाले. पण ३२ वर्षे ज्या पक्षाबरोबर तुम्ही सोन्याच्या ताटात जेवले, लोणचंही खाल्लं तेव्हा सर्व तुम्हाला मिळत होतं. आता हे सोन्याचं ताट पाहून शिवसेना पुन्हा भाजपसोबत येईल आणि सत्ता स्थापन करेल, अशी अपेक्षा आहे. शिवसेनाचं खूप मजेदार धोरण आहे. पोटात एक आणि ओठात एक, अशी शिवसेनेची भूमिका कायम राहिली आहे. शिवसेना ओबीसींच्या न्याय देण्याच्या हितात ते नाही आणि नाही शिवसेने समर्थन केलंय. यामुळे शिवसेनेची भूमिका काय हे स्पष्ट होत नाही, असा टोला अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी लगावला.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#shiv #sena #भजपसबत #सततत #असतन #सनयचय #तटत #जवतन #गड #लगल #परतम #मड #नवनत #रणच #लकसभत #हललबल

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

आक्रमक स्वरुपात ‘कडक लक्ष्मी’ देवाकडे व्यथा करतेय व्यक्त

मुंबई : 'तुला ठाव नाही तुझी किंमत किती, चल दाखव या दुनियेला हिम्मत किती... ' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं ‘कडक लक्ष्मी’ (Kadaklakshmi) गाणं नुकताचं...

Urfi Javed ची झाली बिकट अवस्था, जाड साखळ्यांचा टॉप घातल्याने गळ्याभोवती जखमा

मुंबई: उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर तिच्या अतरंगी फॅशनमुळे चांगलीच चर्चेत असते. तिच्या या अतरंगी फॅशनमुळे काहीजण तिचं भरभरून कौतुक करतात तर...

एकनाथ शिंदे सरकारची उद्या बहुमत चाचणी, शिंदे गटाची सरशी, शिवसेनेचा व्हिप रद्द

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची उद्या परीक्षा आहे....

विम्बल्डन टेनिस स्पर्धा :  श्वीऑनटेक, गॉफ पराभूत; हालेप, फ्रिट्झची आगेकूच

लंडन: फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची विजेती इगा श्वीऑनटेक आणि उपविजेती कोको गॉफचे विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. पुरुषांच्या...

ओबीसी आरक्षणाची लढाई आता शिंदे-फडणवीस सरकारने लढावी : छगन भुजबळ

मुंबई : "ओबीसी आरक्षणाची (OBC reservation) लढाई आता सुप्रीम कोर्टात लढायची आहे, शिंदे-फडणवीस सरकारने ती लढावी.  आम्ही योग्य...

महान संतांच्या वास्तव्याने पावन झाली मंगळवेढा भूमी; जाणून घ्या इतिहास

Solapur News : आधी पाहावी पंढरी, मग पाहावी संतभूमी असा गौरव सोलापुरातल्या मंगळवेढ्याचा केला जातो. पंढरपूरपासून अवघ्या 21...