Sara Ali Khan Injured : अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या ‘अतरंगी रे’ या सिनेमाचं शूटींग करत आहे. या शुटींग दरम्यान साराला दुखापत झाली आहे. स्वत: साराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिला झालेल्या दुखापतीची माहिती चाहत्यांना दिली आहे.
साराच्या ‘अंतरंगी रे’ सिनेमाचं चित्रीकरण सुरु असताना त्याला दुखापत झाली. साराच्या नाकाला दुखापत झाली असल्याचे तिने व्हिडीओमध्ये दाखवले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना साराने गंमतीशीर कॅप्शन देखील दिले आहे. साराने कॅप्शनमध्ये आपल्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. लिहिले आहे की, “सॉरी… अम्मी – अब्बा मी तुमचे नाक कापले.” अतरंगी रे या सिनेमात सारासोबत अक्षय कुमार आणि साऊथचा सुपरस्टार धनुष आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटाचे शुटिंग गेल्या वर्षी पूर्ण होणार होते. परंतु कोरोना लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शुटिंग पुढे ढकलण्यात आले.
या शिवाय सारा आसममध्ये एका डॉक्युमेंट्रीच्या शुटिंगमध्ये व्यस्त होती. ही डॉक्युमेंट्री आसम पोलिस कमांडो बटालियन-वीरांगनेच्या जीवनावर आधारित आहे. सारा कायमच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. नुकतंच सारानं बोल्ड अंदाजात तिच्या इन्स्टाग्रामवर काही हॉट फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
2018 साली केदारनाथ या चित्रपटातून साराने आपल्या करियरची सुरुवात केली होती. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला कुली नंबर 1 हा चित्रपट फ्लॉप ठरला. या शिवाय सारा सिंबा, लव आज कल या चित्रपटात दिसली आहे. सारा अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी आहे. सारा लहान असताना आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर सारा आणि तिचा इब्राहिमची कस्टडी अमृता सिंहला मिळाली
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Sara #Ali #Khan #Injured #चतरपटचय #सटवर #सर #झल #जखम #वहडओ #वहयरल