नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा हा भाजप नेत्यांसाठीही चर्चेचा विषय बनल्याचं दिसतंय.”वो रोज बोलते हैं, हम जवाब क्यों नहीं देते?” असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यानं राज्यातल्या नेत्यांना केल्याचं समजतं. संजय राऊत यांच्या रोजच्या हल्ल्यांना तितकंच जोरदार प्रत्युत्तर द्या असं महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना दिल्लीतून सांगितलं गेल्याची सूत्रांची माहिती आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चार दिवसांच्या दिल्ली दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी संघटन महामंत्री बी एल संतोष, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही भेट घेतली. या भेटीत संघटन, आगामी निवडणुका याबाबतची चर्चा झाल्याचंही कळतंय. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत हे जवळपास रोज माध्यमांतून आपली भूमिका मांडत असतात. कधी महाविकास आघाडीवर होणा-या आरोपांचं समर्थन, तर कधी केंद्रावर हल्लाबोल, विरोधकांना चिमटे. काही महत्वाच्या मुद्द्यांवर भाजपकडून तातडीनं प्रत्युत्तर येतंही, पण सतत देण्याची आवश्यकता भाजपला वाटत नाही. पण मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असल्यानंही जोरदार प्रत्युत्तरावर भर देण्याची आवश्यकता भाजपच्या दिल्ली नेत्यांना वाटत आहे.
हिंदुत्वाच्या मुद्दयावर आक्रमक राहण्याचाही सल्ला दिल्लीतून दिला गेला आहे.एकत्रित सत्तेत असतानाही संजय राऊत सामनामधून महायुतीच्या सरकारवर हल्ले करायचे, पण त्यावेळी सोबत असल्यानं त्याकडे कानाडोळा करण्याची भाजपची भूमिका होती. सामना वाचतच नाही असंही त्यावेळी अनेक नेते सांगताना दिसत होते. पण आता दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधातच असल्यानं या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देणारी यंत्रणा उभी करा असं सांगितलं जातंय.
संबंधित बातम्या :
Mumbai Local Train : रेल्वे ही भाजपची नोकर आहे का? संजय राऊत यांचा रावसाहेब दानवेंना सवाल
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Sanjay #Raut #सजय #रऊतचय #रजचय #पतरकर #परषदच #वषय #जवह #दलल #भजपमधय #नघत