Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या Sangli : CM Uddhav Thackeray यांच्याकडून कसबे डिग्रस येथील पूरग्रस्तांशी संवाद ABP...

Sangli : CM Uddhav Thackeray यांच्याकडून कसबे डिग्रस येथील पूरग्रस्तांशी संवाद ABP Majha


#ABPMajha #CMUddhavThackeray #Sangli

सांगली : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीत अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भिलवडी गावाची पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. अवघ्या 5 ते 7 मिनिटांत मुख्यमंत्र्यांनी हा दौरा आटोपला. अनेकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनंही दिली. 

भिलवडी येथे नागरिकांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जुन सांगितलं की, सरकार सर्वोतोपरी मदत करेल, पण वेळप्रसंगी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. तसेच त्या निर्णयांसाठी तुम्ही आम्हाला साथ द्याल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. जर पुनर्वसन करायचं असेल तर काही जणांचा विरोध होण्याचीही शक्यता आहे. दरवर्षी पूर येतो, दरवर्षी नुकसान होतं. चार महिने विस्थापितांचं जगणं जगावं लागतं. हे सगळं कुठेतरी थांबवायचं असेल, तर पुनर्वसनाचा विचार करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं. 

मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की, “अनेकांचे संसार उद्ध्वस्त कोरोनामुळे झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनानं काम सुरु केले. सांगलीच्या या भागांत 4 लाख लोकांचं स्थलांतर केलं. प्राधान्यक्रम जीवितहानी न होण्याला आहे. मला विश्वजित कदम यांनी पूर कुठपर्यंत वाढला होता ते दाखवले. लोकांचे आर्थिक आणि शेतीचे नुकसान झाले आहे. मी तळीये, चिपळूण, कोल्हापूर याठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे. नुकसान पाहिले आहे. तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच.” पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आपल्याला नम्र विनंती आहे की, किती नुकसान झाले आहे, त्याचे सगळी आकडेवारी मिळत आहे. शेती, घरदार एकूणच किती नुकसान झाले याचा अंदाज घेणं सुरु आहे.”

“काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील, आपली त्याला तयारी हवी कारण दरवर्षी हे पुंरचे संकट येणार आणि आपण त्यातून उभे राहणार की, परत दुसऱ्या वर्षी तेच. दरवर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचे नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे ते करणार, असं काही झालं की, लगेच पॅकेज जाहीर केलं जातं. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचं आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सूचनांचा नक्की विचार करू.”, असं अश्वासनही मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांशी बोलताना दिलं आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Sangli #Uddhav #Thackeray #यचयकडन #कसब #डगरस #यथल #परगरसतश #सवद #ABP #Majha

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

‘रुपी’वरील हातोडा टाळता आला असता?

१९१२ मध्ये स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील या जुन्या बँकेला सहकार क्षेत्रातील अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांची बळी ठरल्याने ही घरघर लागली आहे. सचिन रोहेकर मराठी माणसांनी सुरू...

अभिनेत्री व्हायचं बालपणीचं ठरवलेलं, स्टारकिड असूनही स्वतःच्या बळावर मिळवले चित्रपट!

Sara Ali Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आज (12 ऑगस्ट) तिचा 27वा...

छत्रपतींच्या पुतळ्याची सुटका कधी? पुतळा तीन वर्षांपासून तयार, पण सीएसटीवर कधी विराजमान होणार?

<p><strong>मुंबई:</strong> छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव असलेल्या स्थानकावर छत्रपतींचा भव्य पुतळा असावा अशी मागणी केली गेली. त्यानंतर तज्ञांशी सल्लामसलत करून जेजे स्कूल ऑफ...

Mumbai: ‘खूप आमिषे दाखवली जातील पण कुणाचं ऐकू नका’ उद्धव ठाकरेंचा मुंबईतील माजी नगरसेवकांना कानमंत्र

<p><strong>Mumbai:</strong> मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसलीय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मुंबईतील माजी नगरसेवकांशी संवाद साधला. येत्या काळात...

मुंबईत शुक्रवारी 871 रुग्णांची नोंद, 445 कोरोनामुक्त

Mumbai Corona Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या...

2023 मध्ये बेबी पावडर उत्पादनावर बंदी आणणार, जॉनसन अँड जॉनसन कंपनीचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण

Johnson and Johnson Baby Talc : जॉनसन अँड जॉनसन (Johnson and Johnson) कंपनीने बेबी पावडर उत्पादन बंद करण्याचा मोठा...