Friday, May 20, 2022
Home करमणूक Salman Khan : मोठे केस, रागीट अंदाज; सलमान खानच्या नव्या चित्रपटातील...

Salman Khan : मोठे केस, रागीट अंदाज; सलमान खानच्या नव्या चित्रपटातील लूकची चर्चा


Salman Khan New Look From His Upcoming Film : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानचा दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर नवीन चित्रपट प्रदर्शित होतो. मात्र यावर्षी ‘भाईजान’चा नवा चित्रपट न आल्याने त्याचे चाहते काहीसे नाराज झाले होते. मात्र सलमान खानच्या चाहत्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. सलमान खानने त्याच्या आगामी नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. सलमानने इंस्टाग्रामवर त्याच्या नव्या लूकचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 

सलमान खानने शेअर केलेल्या फोटोमध्ये सलमान खानचा नवा अंदाज पाहायला मिळत आहे. सलमानने इंस्टाग्रामवर चित्रीकरणा दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. सलमानचा हा नवा लूक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नव्या फोटोंमध्ये मोकळे केस, ब्लॅक टी-शर्ट, ब्लॅक जॅकेट, गॉगल चेहऱ्यावर राग आणि हातात लोखंडी रॉड असा सलमानचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे.

नव्या लूकवरून आगामी चित्रपटात सलमान खान जबरदस्त अॅक्शन करताना पाहायाला मिळणार असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, सलमानच्या आगामी चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. चित्रपटाच्या नावाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, मात्र हा चित्रपट बिग बजेट असल्याचं बोललं जात आहे.


सलमानचा नवा लूक पाहिल्यानंतर सलमान खानचे चाहते चित्रपटाच्या नावाची आणि स्टारकास्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान 2021 मध्ये ‘अंतिम’ चित्रपटात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही. आता सलमानचे चाहते त्याच्या दमदार भूमिकेसह नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘कभी ईद, कभी दिवाळी’ चित्रपटाव्यतिरिक्त सलमान खान ‘टायगर 3’ चित्रपटामध्येही दिसणार आहे. त्याचबरोबर शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि तेलगू चित्रपट ‘गॉड फादर’मध्येही सलमान खान कॅमिओ भूमिकेत झळकणार आहे. ‘गॉड फादर’ हा सलमान खानचा तेलुगू डेब्यू चित्रपट आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Salman #Khan #मठ #कस #रगट #अदज #सलमन #खनचय #नवय #चतरपटतल #लकच #चरच

RELATED ARTICLES

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

Most Popular

तलावाचा वापर न करता मत्सपालन करा तेही वर्षाला पाचपट फायद्यासह, जाणून घ्या पद्धत

मुरादाबाद, 19 मे : उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला परिसरात एका शेतकऱ्यांने मत्सपालनातून (Fish farming) विक्रमी उत्पादन घेतले आहे. माझोला या...

थायलंड खुलीबॅडमिंटन स्पर्धा : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; आज यामागुचीचे आव्हान | Thailand Open Badminton Tournament Indus semifinals Yamaguchi challenge today ysh 95

पीटीआय, बँकॉक : दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने गुरुवारी कोरियाच्या सिम यू जिनला नमवून थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी...

Todays Headline 20th May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं...

‘माझ्या कृत्याचा पश्चाताप नाही’, वडिलांनीच मुलगा-सूनेचा संसार संपवला

वडिलांनी असं का केलं? आधी सुखी संसाराचा आशीर्वाद दिला मग मुलाचाच संसार उद्ध्वस्त केला....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

संभाजीराजे महाविकास आघाडीकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार? मुख्यमंत्री संभाजीराजे यांच्यात चर्चा

Sambhaji Raje  meets cm Uddhav Thackeray : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर...