Saturday, July 2, 2022
Home क्रीडा Rohit Sharma का मानतोय सर्वांचे आभार? 'त्या' ट्विटमुळे निवृत्तीच्या चर्चांना उधाण!

Rohit Sharma का मानतोय सर्वांचे आभार? ‘त्या’ ट्विटमुळे निवृत्तीच्या चर्चांना उधाण!


मुंबई : टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज, सलामीवीर रोहित शर्मा सध्या इग्लंड दौऱ्यावर आहे. कोरोनामुळे होऊ न शकलेल्या इग्लंडविरूद्ध पाचव्या कसोटी सामन्यासाठी तो तयारी करतोय. या दरम्यान रोहित शर्माने ने ट्विट केले आहे. या ट्विटवरून रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.  

रोहित शर्माने 23 जून 2007 रोजी भारताकडून आयर्लंडविरुद्ध पदार्पण केले होते. पदार्पणानंतर  मागे वळून न पाहता गोलंदाजांची धुलाई करत तो रो’हिट’ शर्मा ठरलाय. गोलंदाजांना रोहित शर्मा नामक फलंदाजाची मैदानावर भीती वाटायला लागलीय. इतपत त्याचा मैदानात दरारा आहे. 

आज रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त रोहितने ट्विटरवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. 

पोस्ट जशीच्या तशी 
 सर्वांना नमस्कार, आज मी भारतासाठी पदार्पण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण करत आहे. हा एक प्रवास आहे जो मी आयुष्यभर जपत राहीन. 

मी या प्रवासाचा भाग असलेल्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो. मी खेळाडू बनण्यासाठी ज्यांनी मला मदत केली त्यांचे विशेष आभार. सर्व चाहत्यांचे, क्रिकेट प्रेमींचे आणि समीक्षकांचे संघावरील प्रेम आणि समर्थनाबद्दल आभार, असे त्याने म्हटले आहे.  

रोहित शर्माच्या या ट्विटनंतर अनेक जण त्याला शुभेच्छा देत होते. तर काही जणांनी त्याच्यावर टीकाही केली.एक य़ुझरतर त्याच्या निवृत्तीवरचं पोहोचला. त्याने लिहले की, निवृत्तीच्या शुभेच्छा रोहित. आम्ही तुझी अजिबात आठवण काढणार नाही, अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.

  वनडे-टी-20 रेकॉर्ड 

रोहित शर्माच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आहेत. त्याने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 264 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये चार शतके झळकावली. 

 कामगिरी 
रोहित शर्माने भारतासाठी  45 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये 8 शतकांच्या जोरावर 3137 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, 230 एकदिवसीय सामन्यांमध्ये 9283 धावा केल्या आहेत, ज्यात 29 शतकांचा समावेश आहे. T20 क्रिकेटमध्ये त्याने आपल्या बॅटने 3313 धावा केल्या आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Rohit #Sharma #क #मनतय #सरवच #आभर #तय #टवटमळ #नवततचय #चरचन #उधण

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

गर्लफ्रेंडसोबत खाजगी वेळ घालवणं सुपरस्टारला पडलं महागात, 10 वर्षाच्या मुलाकडून करोडोंचं नुकसान

मुंबई : जोडीदारासोबत वेळ घालवणं ही एका नात्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्रत्येक नवरा-बायकोनं किंवा जोडीदारानं कामात कितीही व्यस्त असलं तरी एकमेकांसाठी वेळ नक्की...

Flipkart Sale ला सुरुवात, चक्क अर्ध्या किंमतीत मिळतोय ४३ इंच स्मार्ट टीव्ही; पाहा ऑफर

नवी दिल्ली :Flipkart Big Bachat Dhamaal Sale: ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर आजपासून बिग बचत धमाल सेल (Flipkart Big Bachat Dhamaal Sale) सुरू झाला...

रणबीरच्या शमशेरा चित्रपटात ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार महत्त्वाची भूमिका

मुंबई, 1 जुलै : अभिनेता रणबीर कपूरच्या 'शमशेरा' या (Shamshera look) आगामी चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. अभिनेता  रणबीर कपूर (Ranbir Kapoor),...

बर्मिंगहॅम कसोटी मिस करू नका, क्रिकेटची ही दिग्गज जोडी पुन्हा दिसणार नाही

मुंबई :विराट कोहली विरुद्ध जेम्स अँडरसन यांच्यातील लढत कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम लढत मानली जाते. टीम इंडियाच्या २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना अँडरसनने विराटला...

Sanju Samsonने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर्ड व्हावं,क्रिकेट वर्तुळात एकचं चर्चा

मुंबई : टीम इंडियातला प्रतिभावंत खेळाडू संजू सॅमसनच्या निवृत्तीची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगलीय. त्यामुळे संजू चाहते सध्या शॉकमध्ये आहेत. प्रत्येक सामन्यात धावांचा पाऊस...

मानवरहित एयरक्राफ्ट विकसित करण्यात यश, कर्नाटकात पहिल्या विमानाचं उड्डाण

मुंबई, 1 जुलै: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO)  विकसित केलेल्या मानवरहित एयरक्राफ्टची (Unmanned Aircraft) आज कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट...