Saturday, August 13, 2022
Home टेक-गॅजेट Redmi च्या ‘या’ लोकप्रिय स्मार्टफोनसाठी मोजावे लागणार जास्त पैसे, कंपनीने चौथ्यांदा वाढवली...

Redmi च्या ‘या’ लोकप्रिय स्मार्टफोनसाठी मोजावे लागणार जास्त पैसे, कंपनीने चौथ्यांदा वाढवली किंमत


हायलाइट्स:

  • Redmi Note 10 च्या किंमतीत चौथ्यांदा वाढ.
  • स्मार्टफोन १३,४९९ रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध.
  • फोनमध्ये मिळेल ५००० एमएएचची बॅटरी.

नवी दिल्ली : शाओमीने आपला शानदार स्मार्टफोन Redmi Note 10 च्या किंमतीत चौथ्यांदा वाढ केली आहे. याआधी देखील कंपनीने तीनदा या फोनची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. तसेच, यात स्नॅपड्रॅगन ६७८ प्रोसेसर मिळतो.

वाचा: Airtel vs Jio vs Vi: १०० रुपयांच्या आत ‘या’ कंपनीचा प्लान सर्वोत्तम, मिळेल २१ जीबी डेटा

Redmi Note 10 ची नवीन किंमत

कंपनीने रेडमी नोट १० स्मार्टफोनची किंमत ५०० रुपयांनी वाढवली आहे. आता फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,४९९ रुपये, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किमत १५,९९९ रुपये आहे. डिव्हाइसची नवीन किंमतीसह कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon India वर उपलब्ध आहे.

Redmi Note 10 चे फीचर्स

रेडमी नोट १० स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंच एफएचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आणि ब्राइटनेस ११०० निट्स आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ देण्यात आले आहे. याशिवाय फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६७८ प्रोसेसर मिळतो. हा फोन अँड्राइड ११ वर आधारित MIUI १२ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

Redmi Note 10 चा कॅमेरा

रेडमी नोट १० स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा Sony IMX५८२ सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर मिळतो. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

Redmi Note 10 ची बॅटरी आणि कनेक्टिविटी

रेडमी नोट १० स्मार्टफोनम्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. याशिवाय स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी सारखे कनेक्टिव्हिटी फीचर मिळतील. डिव्हाइसमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो.

वाचा: ‘या’ कंपनीने भारतात कमी किंमतीत लाँच केले ३ वायरलेस इयरफोन्स, किंमत १,४९९ रुपयांपासून सुरू

वाचा: अखेर रेडमीचे दोन शानदार लॅपटॉप्स भारतात लाँच, कर्मचारी-विद्यार्थ्यांसाठी उपयोगी; पाहा किंमत

वाचा: ‘या’ चार चुकांमुळे स्मार्टफोन होऊ शकतो लवकर खराब, पाहा डिटेल्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Redmi #चय #य #लकपरय #समरटफनसठ #मजव #लगणर #जसत #पस #कपनन #चथयद #वढवल #कमत

RELATED ARTICLES

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

Most Popular

पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे....

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...