Saturday, August 13, 2022
Home विश्व REAL HERO: वादळी वाऱ्यात समुद्रात अडकलेल्या अनोळखी व्यक्तीसाठी तरुणाने घेतली झेप; पण...

REAL HERO: वादळी वाऱ्यात समुद्रात अडकलेल्या अनोळखी व्यक्तीसाठी तरुणाने घेतली झेप; पण…


लंडन, 2 ऑगस्ट: संकटात अडकलेल्या व्यक्तींना सोडवण्यासाठी पटकन तयार होणाऱ्यांची संख्या कमी असते. त्यातही संकटात अडकलेली व्यक्ती अनोळखी असेल, तर ही शक्यता आणखी कमी होते; पण अशा एका दुर्मीळ व्यक्तीचं (Real Hero) दर्शन नुकतंच ब्रिटनमध्ये (Britain) घडलं. वादळ आल्यावर समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळतात आणि समुद्र रौद्र रूप धारण करतो. अशा वेळी त्यात कोणी व्यक्ती अडकली असेल, तर ती वाचणं आणि तिला वाचवणं या दोन्ही गोष्टी कठीण. अशा वादळी समुद्रात एक व्यक्ती अडकली असल्याचं पाहून एका तरुणाने मागचापुढचा विचार न करता थेट समुद्रात उडी मारली. ती व्यक्ती वाचली; मात्र अनोळखी व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी समुद्रात झेप घेतलेल्या या तरुणाचे प्राण मात्र दुर्दैवाने वाचू शकले नाहीत.

22 वर्षांच्या या रिअल लाइफ हिरोचं नाव आहे अॅलेक्स गिब्सन (Alex Gibson). ब्लॅकपूलजवळ (Blackpool) वादळामुळे उधाण आलेल्या समुद्रात अडकलेल्या एका व्यक्तीची सुटका करण्यासाठी अॅलेक्स गिब्सनने समुद्रात उडी मारली. एचएम कोस्टगार्ड फ्लीटवूड (HM Coastguard Fleetwood), एचएम कोस्टगार्ड लिथम (HM Coastguard Lytham), आरएनएलआय फ्लीटवूड (RNLI Fleetwood), आरएनएलआय ब्लॅकपूल (RNLI Blackpool) यांच्यासह एक कोस्टगार्ड हेलिकॉप्टर घेऊन अॅलेक्सच्या मदतीसाठी दाखल झाले होते. अॅलेक्स ज्या व्यक्तीच्या मदतीसाठी समुद्रात उतरला होता, त्या व्यक्तीला वाचवण्यात यश आलं, असं सांगण्यात येत आहे; मात्र अॅलेक्सचे प्राण वाचू शकले नाहीत. अॅलेक्सला ब्लॅकपूल व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं; मात्र तो वाचू शकला नाही.

हवामान विभागाने असा अंदाज वर्तवला होता, की येत्या काही दिवसांत हवामानात फार वेगाने बदल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार बदल झाले होते. त्यामुळेच ती व्यक्ती समुद्रात अडकली होती.

तुमची छोटीशी चूक आणि बाथरूम, टॉयलेटमध्येच येईल Heart attack

समुद्रात अडकलेल्या त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी अॅलेक्स समुद्रात उतरला होता. तो ‘फ्रेश फिश अँड चिप्स’मध्ये काम करत होता. त्याच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर शुक्रवारी (30 जुलै) दुकान बंद ठेवण्यात आलं होतं. त्याला श्रद्धांजली वाहताना दुकानमालकाने म्हटलं, ‘अॅलेक्स एक उत्तम गुण असलेला युवक होता. तो बुद्धिमान तर होताच; पण मेहनती, कायम आनंदी राहणारा आणि लोकांची काळजी घेणारा होता, हे त्याचे मित्रही मान्य करतील. दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी त्याने आपलं बलिदान दिलं. त्याचं आपल्या सहकाऱ्यांवरही खूप प्रेम होतं. आम्हाला त्याची खूप आठवण येईल.’अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#REAL #HERO #वदळ #वऱयत #समदरत #अडकललय #अनळख #वयकतसठ #तरणन #घतल #झप #पण

RELATED ARTICLES

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

Most Popular

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....