Thursday, July 7, 2022
Home क्रीडा Ranji Trophy Final 2022 Mumbai batter Sarfaraz Khan celebrates his Century with...

Ranji Trophy Final 2022 Mumbai batter Sarfaraz Khan celebrates his Century with thigh-five and tears of joy vkk 95MUM vs MP Ranji Trophy final : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजीचा अंतिम सामना खेळवला जात आहे. देशांतर्ग क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात मुंबई आणि मध्य प्रदेश एकमेकांशी दोन हात करत आहेत. मुंबई आपले ४२वे विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहे तर मध्य प्रदेशचा संघ २३ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सर्फराज खानने या हंगामातील चौथे शतक पूर्ण केले आहे. अंतिम सामन्यात शतक साजरे केल्यानंतर सर्फराजने अनोख्या अंदाजात आनंद साजरा केला.

रणजीच्या अंतिम सामन्यात शतक पूर्ण करताना मुंबईचा फलंदाज सर्फराज खान भावूक झाला होता. शतक साजरे करताना २३ वर्षीय फलंदाज हेल्मेट काढताना रडताना दिसला. त्यानंतर त्याने शिखर धवन-स्टाईलने शड्डू ठोकून आनंद साजरा केला. या वर्षाच्या रणजी हंगामातील हे त्याचे चौथे आणि प्रथम श्रेणीतील आठवे शतक ठरले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सर्फराजने शतक पूर्ण केलेल्या क्षणाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर सर्फराज ४० धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी डावाची सुरुवात केल्यानंतर त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यासाठी त्याने १५२ चेंडू घेतले. या दरम्यान मुंबईच्या फलंदाजीची पडझड सुरू होती. त्यामुळे संघाला चांगल्या स्थितीत पोहचवण्यासाठी सर्फराजने आपल्या खेळाची गती वाढवली. त्याने अवघ्या ३८ चेंडूंत पुढील पन्नास धावांचा टप्पा पार करून शतक साजरे केले.

हेही वाचा – Rohit Sharma Emotional Note : ‘या’ कारणामुळे रोहित शर्माने चाहत्यांसाठी लिहिली भावनिक पोस्ट

मुंबईचा फलंदाज सर्फराज खान यंदाच्या रणजी करंडकामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने या वर्षीच्या रणजी करंडक स्पर्धेतील शेवटच्या तीन साखळी सामन्यांमध्ये १६५, ६३, ४८ अशा केल्या होत्या. शिवाय, मुंबई विरुद्ध उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यातही त्याने १५४ धावा केल्या होत्या. गेल्या रणजी हंगामात त्याने एकूण ९२८ धावा केल्या होत्या. प्रत्‍येक प्रथम श्रेणीतील शतकामध्ये १५० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. या हंगामामध्येदेखील सातत्यपूर्ण कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध करून दाखवली आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Ranji #Trophy #Final #Mumbai #batter #Sarfaraz #Khan #celebrates #Century #thighfive #tears #joy #vkk

RELATED ARTICLES

ईडीच्या छापेमारीनंतर आता Vivo चे डायरेक्टर देशातून फरार, मनी लाँड्रिंग आणि टॅक्स चोरीचा आरोप

ED raids on Vivo : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चिनी मोबाईल कंपनी Vivo विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास तीव्र...

Aadhar Cardलाही असते एक्सपायरी डेट! असं करता येतं रिन्यू

मुंबई, 6 जुलै: आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्रं म्हणून वापरलं जाणारं ओळखपत्र बनलं आहे. आधारकार्ड आता जवळपास सर्व शासकीय योजनांसाठी गरजेचं असतं. थोडक्यात...

UK Political Crisis: ब्रिटनमध्ये चाललंय काय! आतापर्यंत 39 मंत्र्यांचा राजीनामा

UK Political Crisis:  ब्रिटनमध्ये राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून मागील 24...

Most Popular

पहिल्यांदा केला डान्स, नंतर धोनीने असा कापला केक; लंडनमध्ये Birthday साजरा

नवी दिल्ली, 07 जुलै : भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली दोन विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी (गुरुवारी (7 जुलै) 41 वर्षांचा झाला आहे. त्याचा...

Live : पंतप्रधान मोदींनी स्वीकारला मुख्तार अब्बास नकवींचा मंत्रिपदाचा राजीनामा

शिवसेनेला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे आता बंडखोर शिंदे गटाच्या मार्गावर आहेत. त्यांनी...

‘विठ्ठल’च्या निवडणुकीत सत्ताधारी भालके गटाला मोठा हादरा, 18 वर्षानंतर सत्तांतर; दिग्गज पराभूत

Vitthal Sahkari Sakhar Karkhana Election :  पंढरपूर तालुक्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी गेल्या 24...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...