That 1⃣0⃣0⃣ Feeling! 👏 👏
What a fine 💯 this has been by Yash Dubey in the @Paytm #RanjiTrophy #Final! 👍 👍 #MPvMUM
Follow the match ▶️ https://t.co/xwAZ13U3pP pic.twitter.com/3eqSSmbDfm
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 24, 2022
यश दुबेने 234 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं, यादरम्यान त्याने 12 फोर मारल्या. रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये त्याचं हे पहिलंच शतक आहे. यशच्या या शतकी खेळीमुळे मध्य प्रदेशला मॅचमध्ये कमबॅक करता आलं. दुसरीकडे शुभम शर्मानेही चांगली बॅटिंग केली. 215 बॉलमध्ये 116 रन करून तो आऊट झाला. यश प्रमाणेच शुभमचंही रणजी फायनलमधलं हे पहिलंच शतक आहे. याआधी त्याने क्वार्टर फायनलमध्येही 102 रनची खेळी होती.
मुंबईने केल्या 374 रन
याआधी मुंबईने त्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये 374 रन केल्या. सरफराज खानने 134 रनची शतकी खेळी केली, याशिवाय यशस्वी जयस्वालने 78 रन केले. तर कर्णधार पृथ्वी शॉ 47 रनवर आऊट झाला. मध्य प्रदेशकडून गौरव यादने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. अनुभव अग्रवालला 3 विकेट घेण्यात यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Ranji #Final #सरफरजवर #भर #पडल #यशशभम #मधय #परदशवरदध #मबई #बकफटवर