पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने विषप्राशन करुन आत्महत्या केलीय. अमर मोहिते असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.. मूळचा सांगलीचा असणारा अमर पुण्यातील सदाशिव पेठेत राहत होता. गेल्या 2 वर्षांपासून अमर पोलीस उपनिरीक्षकपदाची तयारी करत होता. शारीरिक क्षमता चाचणीत केवळ एका गुणाने त्याची संधी हुकली. त्याच नैराश्यातून अमरने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिलीय. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. आता अमर मोहिते या तरुणाने जीवन संपवलंय. विविध कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीची तयारी करणाऱ्या परीक्षार्थ्यांमध्ये काहीसं निराशेचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र यश-अपयश जीवनाचा भाग आहे. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना खचून जाऊ नका आणि टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन एबीपी माझा करतंय..
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Pune #पणयत #MPSC #करणऱय #तरणच #आतमहतय #नरशयतन #टकच #पऊल #उचललयच #महत