Saturday, August 13, 2022
Home टेक-गॅजेट PUC कडे लक्ष न देणं पडेल भारी, RC सस्पेंडसह भरावा लागेल दंड;...

PUC कडे लक्ष न देणं पडेल भारी, RC सस्पेंडसह भरावा लागेल दंड; जाणून घ्या नवा नियम


नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : टू-व्हिलर आणि फोर व्हिलर चालकांना आता PUC कडे लक्ष न देणं भारी पडू शकतं. अनेक जण PUC बाबत गंभीर नसतात, तसंच नियमितपणे गाड्यांमध्ये प्रदूषण तपासणीदेखील करत नाही. केवळ PUC सर्टिफिकेट बनवण्याची प्रक्रिया केली जाते, परंतु प्रदूषणाची योग्य ती तपासणी होत नाही. परंतु आता Pollution Certificate मुळे समस्येचा सामना करू लागू शकतो. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने Pollution Certificate (PUC) बाबत मोठा निर्णय घेतला आहे. वाहन चालकाकडे PUC नसल्यास, RC सस्पेंड होण्यासह मोठा दंडही भरावा लागू शकतो.

Pollution Under Control (PUC) आता सर्व गाड्यांसाठी संपूर्ण देशात यूनिफॉर्म केलं जाणार आहे. PUC नॅशनल रजिस्टरशी लिंक केलं जाणार आहे. सध्या PUC साठी प्रत्येक राज्यात वेगवेगळे फॉर्मेट आहेत. परंतु आता सरकारने संपूर्ण देशात PUC साठी एकच नियम लागू होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच यात काही नवे फीचर्सही जोडले जाणार असल्याचं सांगितलं आहे.

नव्या गाडीसाठी पीयूसी सर्टिफिकेट घेण्याची गरज नसते. परंतु वाहनाच्या रजिस्ट्रेशनच्या एका वर्षानंतर पीयूसी सर्टिफिकेट (PUC Certificate) घेणं गरजेचं आहे. हे सर्टिफिकेट वेळोवेळी रि-न्यू करणं आवश्यक आहे.

(नैसर्गिक आपत्तीत कारचं नुकसान झालं तर विम्याचे पैसे कसे मिळतात?)

सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, वाहन इन्शोरन्स पॉलिसीच्या रिन्यूवेळी वीमा कंपन्या तुमचं पीयूसी सर्टिफिकेट वैध आहे की नाही याची तपासणी करतील. जुलै 2018 मध्ये वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करत, सर्वाच्च न्यायालयाने वीमा कंपन्यांना हे आदेश दिले होते. पीयूसी सर्टिफिकेट सादर करेपर्यंत इन्शोरन्स पॉलिसी रिन्यू न करण्याचं सर्वाच्च न्यायालयाने म्हटलं होतं.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#PUC #कड #लकष #न #दण #पडल #भर #ससपडसह #भरव #लगल #दड #जणन #घय #नव #नयम

RELATED ARTICLES

तो बिर्याणी खातो आणि…; टीम इंडियाच्या गोलंदाजाबद्दल हे काय बोलून गेला Rohit sharma

रोहित शर्मा आता आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

Most Popular

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे....

महिलांची ‘आयपीएल’ पुढील वर्षी मार्चमध्ये?

पीटीआय, नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिलांच्या स्वतंत्र इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) मार्च २०२३पासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ही लीग...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....