Saturday, July 2, 2022
Home करमणूक Pornography Case: शर्लिन चोप्राच्या जबाबाचा राज कुंद्राच्या जामिन अर्जावर पडणार फरक?

Pornography Case: शर्लिन चोप्राच्या जबाबाचा राज कुंद्राच्या जामिन अर्जावर पडणार फरक?


हायलाइट्स:

  • राज कुंद्राच्या जामिन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार
  • शर्लिन चोप्राच्या जबानीमुळे राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ
  • शर्लिनच्या जबानीमुळे राजचा जामिन अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता

मुंबई : अश्लिल व्हिडिओ तयार करणे आणि ते इंटरनेटवर अॅपच्या माध्यमातून अपलोड केल्या प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा याला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर राज हा २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत होता. राजने जामिन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु किला कोर्टाने त्याचा जामिन फेटाळून लावत १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर राजने पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र आजही त्याच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

पोलिसांच्या उत्तरावर दिला जाणार निकाल?

राज कुंद्राच्या जामिन अर्जावर न्यायालयाने मुंबई पोलिसांकडून उत्तर मागवले आहे. या प्रकरणी पोलीस जे उत्तर देतील त्यावर राजच्या जामिन अर्जावरील निकाल लागणार असल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँचच्या वकिलांनी राज कुंद्राच्या जामिनाला विरोध केला. या सगळ्यात शर्लिन चोप्राने पोलिसांना जो जबाब दिला त्यामुळे राजचा जामिन फेटाळला जाऊ शकतो असं अनेकांचं म्हणणं आहे. पण यावेळी जामिनावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता २० ऑगस्टपर्यंत राजला पोलीस कोठडीत रहायचे आहे.

AssignmentImage-523168123-1628593201

याआधीही जामिन अर्ज फेटाळला होता

राज कुंद्राने जामिन मिळावा,यासाठी २८ जुलै रोजी अर्ज केला होता. परंतु त्याचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, राज कुंद्राच्या विरोधात केवळ साक्षीदार नाही तर सबळ पुरावे देखील आहेत. राज कुंद्राच्या कार्यालयात घातलेल्या छाप्या दरम्यान ६८ अॅडल्ट व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. राजला जर जामिन दिला तर तो साक्षीदार आणि पुरावे नष्ट करू शकतो, त्यामुळे त्याला जामिन दिला जाऊ नये, अशी मागणी पोलिसांनी केली. पोलिसांनी केलेल्या या युक्तीवादामुळे न्यायालयाने राज कुंद्राचा जामिन अर्ज फेटाळून लावला.

AssignmentImage-2113007237-1628593202

शार्लिन चोप्राची जबाब महत्त्वाचा

राज कुंद्रा प्रकरणामध्ये शर्लिन चोप्राने नोंदवलेला जबाब महत्त्वाचा मानला जात आहे. तिने दिलेल्या साक्षीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागू शकते. शर्लिनने राजला अटक होण्याआधी एप्रिल महिन्यात त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी राज कुंद्राप्रकरणी शर्लिनची सलग आठ तास चौकशी केली. त्यावेळी शर्लिनने राज आणि त्याच्या कंपनीसोबत असलेल्या संबंधांची माहिती दिली. राज कुंद्रासोबत व्हॉटसअॅप चॅटवर झालेले संभाषण आणि कराराची कॉपीही तिने पोलिसांना दिली.

राज- शर्लिनमध्ये झाला होता वाद

शर्लिन चोप्राने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये राज कुंद्रासोबत बिझनेस डिल करताना वाद झाल्याचे सांगितले होते. तिने पुढे असेही सांगितले की, त्यानंतर राज तिच्या घरी आला आणि तिचे जबरदस्ती चुंबन घेतले. शर्लिनने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु अचानक झालेल्या या प्रकरामुळे ती घाबरली होती.

या कलमांखाली राजला झाली अटक

राज कुंद्राच्या विरोधात आयपीसी कलम २९२, २९६ अश्लिल व्हिडिओ बनवणे, विकणे, कलम ४२० लोकांचा विश्वासघात करणे,सूचना प्रौद्योगिकी अधिनियम अंतर्गंत कलम ६७, ६७ अ, अश्लिल व्हिडिओ चित्रीत करणे आणि ते ऑनलाइन शेअर करणे, सामग्री करणे आणि प्रसारित करणे, कलम २ जी, ३, ४, ६,७ महिलांवर अश्लिल फिल्म बनवणे, ते विकणे आणि प्रसारित करणे या कलमांतर्गंत अटक झाली आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Pornography #Case #शरलन #चपरचय #जबबच #रज #कदरचय #जमन #अरजवर #पडणर #फरक

RELATED ARTICLES

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

दिया मिर्झाने केले उद्धव ठाकरेंचे कौतुक, भडकले ‘द कश्मीर फाइल्स’फेम विवेक अग्निहोत्री

मुंबई: एखाद्या सिनेमा-मालिकेतील भासावेत असे 'ट्विस्ट अँड टर्न्स' महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political Crisis) पाहायला मिळाले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपद सोडावे...

तीव्र डोकेदुखी, अशक्तपणाकडे दुर्लक्ष नको; मेंदुचा हा गंभीर आजार झालेला असू शकतो

मुंबई, 02 जुलै : अनेकजण डोकेदुखीचा त्रास होत असताना डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेतात. अशा स्थितीत दुखण्यात काही काळ आराम मिळतो. पण,...

रक्ताची कमतरता भरून काढण्यापासून ते पचनक्रिया सुधारण्यापर्यंत वाचा काळ्या चण्याचे फायदे

Kala Chana Benefits : भारतीय स्वयंपाकघरात कडधान्यात सहज आढळणारे कडधान्य म्हणजे काळे चणे. सहज उपलब्ध असलेल्या काळ्या चण्यात...

आज आहे ‘जागतिक सहकारी दिन’; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

International Co-operative Day 2022 : आंतरराष्ट्रीय सहकारी दिन (International Co-operative Day) दरवर्षी जुलैच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जातो....

पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचवण्यासाठी वापरा या टीप्स

मुंबई, 02 जुलै : पावसाळा (Rainy Season) खूप आनंद घेऊन येणारा ऋतू असतो. अनेकांना हवाहवासा वाटणारा हा पावसाळा काही गोष्टींमुळे त्रासदायक देखील ठरतो. पावसाळ्यात स्वयंपाकघरात ठेवलेले...

ऋषभ पंतच्या बर्मिंगहॅम शतकाची अनोखी कहाणी; जपली चार वर्षांपूर्वीची ‘परंपरा’

बर्मिंगहॅम : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सध्याच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये एक निडर फलंदाज म्हणून आपली छाप पाडली आहे. एकदा का तो...