बँगलोर, 13 जानेवारी : प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi Legaue) पुणेरी पलटणने यू मुंबाचा (U Mumba vs Puneri Paltan) 42-23 ने धुव्वा उडवला आहे. पुणेरी पलटणचा या मोसमातला हा चौथा आणि लागोपाठ दुसरा विजय आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पुणेरी पलटणने उत्कृष्ट डिफेन्स दाखवला, ज्यामुळे यू मुंबाच्या रेडर्सना एक-एक पॉईंटसाठी संघर्ष करावा लागला. पुणेरी पलटणचा कर्णधार नितीन तोमर याने आपला पहिला हाय-5 पूर्ण केला, तर विशाल भारद्वाजलाही त्याचा पहिला हाय-5 पूर्ण करण्यात यश आलं. अभिनेष नादराजन आणि बलदेव सिंग यांनी मिळून 6 यशस्वी टॅकल केले. यू मुंबाकडून कर्णधार फजल अत्राचलीला फक्त एकच पॉईंट मिळवता आला, तर राहुल सेठपालने हाय-5 पूर्ण केलं.
पहिल्या रेडमध्ये फजल अत्राचलीला असलम इनामदारने आऊट करून पुण्याचं खातं उघडलं. यानंतर दोन्ही टीम रेडमध्ये पॉईंट्स मिळवत होती, पण विशालने डू ऑर डाय रेडमध्ये जश्नदीप सिंगला टॅकल करून मॅचचा पहिला डिफेन्समध्ये पॉईंट मिळवला. यानंतर दोन्ही टीममध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली. 11 मिनिटांपर्यंत दोन्ही टीम फक्त 6-6 पॉईंट मिळवू शकल्या होत्या, पण नितीन तोमरने पहिल्याच रेडमध्ये धमाकेदार कामगिरी केली आणि सुपर रेडने आपलं खातं उघडलं. दुसरीकडे राहुल सेठपालने 4 टॅकल करून यू मुंबाला मॅचमध्ये कायम ठेवलं. पण पलटणच्या डिफेन्समुळे मुंबई 16-9 ने पिछाडीवर गेली. यानंतर नितीनने दोन पॉईंट्स डिफेन्समध्ये मिळवले आणि पहिल्या हाफपर्यंत पुण्याचा स्कोअर 18-10 झाला.
असलमच्या सुपर रेडने दुसऱ्या हाफची सुरूवात झाली ज्यामुळे पलटण 21-10 ने आघाडीवर गेली. यानंतर राहुल सेठपालने उत्क टॅकलच्या माध्यमातून आपला हाय-5 मिळवला, तर दुसरीकडे असलम आणि मोहित गोयत पुण्याला पुढे ठेवण्यात यशस्वी ठरले. नितीन तोमरने यशस्वी रेडसह यू मुंबाला मोसमात पहिल्यांदाच तीनवेळा आऊट केलं. यामुळे पुण्याचा स्कोअर 34-16 झाला. विशाल भारद्वाजने अभिषेकला टॅकल करून आपलं हाय-5 पूर्ण केलं. त्याचं या मोसमातलं हे पहिलंच हाय-5 होतं. डिफेन्समध्ये पुण्याला 16 पॉईंट्स मिळाले होते. नितीनने एक सुपर टॅकल करून आपला हाय-5 पूर्ण केला आणि एकूण स्कोअर 9 पर्यंत पोहोचवला. मॅच संपली तेव्हा पुणेरी पलटणचा स्कोअर 42-23 झाला होता, ज्यामुळे पुण्याचा विजय झाला.
प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात या दोन्ही टीममध्ये 15 मॅच झाल्या, यातल्या 9 मॅच यू मुंबाने जिंकल्या, तर 6 मॅचमध्ये पुण्याला विजय मिळाला. या दोन्ही टीममधल्या दोन मॅच टाय झाल्या. पुण्याचा या मोसमातला हा चौथा विजय आहे. 21 पॉईंट्ससह पुण्याची टीम 10 व्या क्रमांकावर आहे. तर यू मुंबा पाचव्या क्रमांकावर आहे. यू मुंबाने 9 पैकी 3 सामने जिंकले तर 3 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि 3 मॅच ड्रॉ झाल्या. यू मुंबाकडे सध्या 25 पॉईंट्स आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#PKL #पण #पडल #मबईवर #भर #पणर #पलटणन #उडवल #य #मबच #धवव