Sunday, January 16, 2022
Home भारत Petrol, Diesel Price : दिवाळीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती जैसे थे

Petrol, Diesel Price : दिवाळीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती जैसे थे


Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 27 November : देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती सलग 25व्या दिवशी बदललेल्या नाहीत. दिवाळीपासून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थे आहेत. शनिवारी, 27 नोव्हेंबर रोजी देशात ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी तेलाच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दिवाळीत पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट केल्यापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशातच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड गुरुवारच्या व्यापारात 0.38 टक्क्यांनी घसरून 81.94 डॉलर प्रति बॅरलवर आले. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्स 0.36 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल $81.95 वर आले. रुपयातही घसरणही झाल्याचं पाहायला मिळालं.

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 

पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी कमी होणार? सरकारनं आखलाय मेगाप्लान 
पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी भारत सरकारचा राखीव पेट्रोलियम साठ्यातून (स्ट्रैटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह) 50 लाख बॅरेल कच्चं तेल रिलीज केलं जाणार आहे. दरम्यान, हे रिलीज करण्यापूर्वी सरकार अमेरिका, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या मोठ्या ग्राहकांचा विचार करण्यात येणार आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Petrol #Diesel #Price #दवळपसन #पटरलडझलचय #कमत #जस #थ

RELATED ARTICLES

WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुम्हीही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स WhatsApp द्वारे कोणत्याही युजरची फसवणूक करू...

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

Most Popular

केवळ शाळेवर विसंबून चालेल?

अनिल कुलकर्णी शाळा सुरू होणार होणार म्हणताना पुन्हा लाट आलीच.. आता तर या लाटांच्या पलीकडे जाऊन, दीर्घकालीन नियोजन करायला हवं, शाळांप्रमाणेच पालक, समाज यांनीही...

WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुम्हीही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स WhatsApp द्वारे कोणत्याही युजरची फसवणूक करू...

Mumbai Metro : मेट्रोचे गर्डर बसवताना दुर्घटना, क्रेन कोसळून चालकाचा मृत्यू

<p>मुंबईत मेट्रोचे गर्डर बसवताना एक दुर्घटना घडलीय. कांजूरमार्ग जंक्शनजवळ मेट्रोचे गर्डर बसवताना क्रेन कोसळून, क्रेन चालकाचा मृत्यू झालाय.. गर्डरच्या वजनानं क्रेन कोसळत असल्याचा...

‘स्टार प्रवाह’ला मोठा झटका, गुळुंब ग्रामपंचायतीने चित्रिकरणाला परवानगी नाकारली

सातारा, 15 जानेवारी : सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडली म्हणून 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane)...

विवाहबाह्य संबंधांमुळे महिलेला 100 चाबकाचे फटके, इंडोनेशियामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन

इंडोनेशिया : विवाहबाह्य संबंध ठेवल्याबद्दल इंडोनेशियामध्ये एका महिलेला 100 चाबकाचे फटके मारण्यात आले आहेत. तर तिच्या पुरुष साथीदाराला...

विराटचा ‘हा’ निर्णय वैयक्तिक; कर्णधारपद सोडल्यानंतर सौरव गांगुली म्हणाले…

मुंबई : विराट कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून आपली कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. विराट कोहलीने शनिवारी...