#Parbhani #IASofficer #AanchalGoyal

परभणी : आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीत मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप असतो हे परभणीतील प्रकाराने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे सेवानिवृत्त झाले त्यांच्या जागी आयएएस आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र पदभार घ्यायच्या दिवशीच त्या परतल्यानं चर्चेला ऊत आला आहे. स्थानिक खासदारांनी ही बदली करवून घेतल्याची चर्चा परभणीत दबक्या आवाजात होत आहे. आता या प्रकरणी पालकमंत्री नबाव मलिक यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.

नवाब मलिक म्हणाले की, जिल्हाधिकारी कोण असावा हे मी ठरवत नाही, आंचल गोयल या मला बोलूनच परभणीमध्ये गेल्या होत्या. पण त्यांना का रुजू होऊ दिलं नाही याबद्दल मला माहिती नाही. आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितून होतात. जीएडी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. काही अज्ञानी आणि लोक माझ्यावर आरोप करत आहेत ते चुकीचे आहेत, असं नवाब मलिक म्हणाले.

ते म्हणाले की, गोंदियाचा पालकमंत्री असताना नयना गुंडे नावाच्या महिला अधिकारी होत्या. माझ्या दोन्ही खात्यामध्ये महिला सचिव आहेत. त्यामुळे महिलांना काम करू दिलं जात नाही हा आरोप चुकीचा आहे. काल मुख्य सचिवांशी या विषयावर मी बोललो ते त्याबद्दल खुलासा करतील, असं ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कोण असावा हे मी ठरवत नाही, आंचल गोयल या मला बोलूनच परभणी मध्ये गेल्या होत्या. पण त्यांना का रुजू होऊ दिलं नाही याबद्दल मला माहिती नाही. मीच त्यांना परभणी मध्ये जाण्यासाठी सांगितलं होतं, पण शेवटच्या दिवशी काय झालं याची मला कल्पना नाही. यासंदर्भात जीएडीचे लोक तुम्हाला उत्तर देऊ शकतील. महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीत असं झालं, तसं झालं बोलणे योग्य नाही हा विषय माझ्या अखत्यारित नाही. जे काही निर्णय आहेत ते मुख्यमंत्री घेत आहेत, असं मलिक म्हणाले.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Parbhani #IAS #अधकऱयचय #बदलय #मखयमतरयचय #अखतयरतन #हतत #नबव #मलक #ABP #Majha