Sunday, January 16, 2022
Home मुख्य बातम्या Parambir Singh : परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी! मुंबईत दाखल होताच चौकशीचा...

Parambir Singh : परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी! मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा


Parambir Singh : मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी (CID) चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी सीआयडी परमबीर सिंह यांची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

सीआयडीकडून दोन गुन्ह्यात परमबीर सिंग यांना समन्स बजावलं असल्याची माहिती सूत्रांची माहिती आहे. सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवशी चौकशीला हजर राहण्याचं समन्स त्यांना पाठवलं आहे. मरीन ड्राईव्हमधील श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना समन्स देऊन चौकशीला सोमवारी बोलावण्यात आलंय. ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात परमबीर सिंग यांना मंगळवारी हजर राहण्यासाठी समन्स देण्यात आलं असल्याची माहिती आहे. ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातून सीआयडीला वर्ग झालेल्या भीमराव घाडगे यांच्या तक्रारीचा अट्रोसिटीच्या गुन्ह्यात परमबीर यांचा जून महिन्यात जबाब सीआयडीने नोंदवला आहे. अट्रोसिटी गुन्ह्यात चंदीगढला जाऊन परमबीर यांचा जबाब सीआयडीकडून नोंदवण्यात आला असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. 

 

फरार घोषित करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती द्या, परमबीर यांचा मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टात अर्ज

परमबीर सिंह मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. कांदिवलीमध्ये सात तास चौकशी झाल्यानंतर परमबीर सिंह ठाण्याच्या ठाणे नगर पोलिस स्टेशन मध्ये चौकशीसाठी हजर झाले. ठाणे नगर पोलिस स्टेशन मध्ये त्यांच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप आहे तर सोमवारी चांदीवाल आयोगासमोर परंबिर सिंह यांना हजर राहायचं आहे. 

Parambir Singh Exclusive : परमबीरांचे पाय खोलात; गृहमंत्रालयातील गोपनीय फाईल निकटवर्तीय संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये

गेल्या दोन महिन्यांत पेक्षाही अधिक काळ बेपत्ता असलेले आणि फरार घोषित करण्यात आलेले परमबीर सिंह मुंबई विमानतळावर उतरले आणि थेट कांदिवली गुन्हे शाखेचे कार्यालय पोहोचले. दुसरा दिवस उजाडला आणि परमबीर सिंह ठाणे नगर पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.

ठाण्यामध्ये परमबीर यांच्यावर एकूण 3 गुन्हे 

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन परमबीर यांच्यासह पराग मणेरे, संजय पुनमिया, सुनील जैन यांनी खंडणी घेतल्याचा शरद अग्रवाल यांचा आरोप आहे. याप्रकरणी कोपरी पोलिसात गुन्हा दाखल आहे.

परमबीर यांच्या इशाऱ्यावरुनच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी धमक्या देऊन आपल्याकडून साडेतीन कोटी रुपये खंडणी वसूल केल्याचा केतन तन्ना, सोनू जालान, रियाज भाटीचा आरोप आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे.

पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्याकडून एससी, एसटी एक्ट अंतर्गत परमबीर सिंह यांच्याविरोधात कल्याण येथील बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Parambir #Singh #परमबर #सहच #आत #सआयड #चकश #मबईत #दखल #हतच #चकशच #ससमर

RELATED ARTICLES

WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुम्हीही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स WhatsApp द्वारे कोणत्याही युजरची फसवणूक करू...

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

Most Popular

विराटने कर्णधारपद सोडण्याबाबत सर्वात आधी ‘या’ व्यक्तीसोबत केली होती चर्चा; बीसीसीआयला नंतर दिली माहिती

१४ जानेवारी रोजी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने गमावली आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ जानेवारीला विराट कोहलीने...

Electric Vehicle वर सरकार किती इन्सेन्टिव देतं? थेट ग्राहकाला होता फायदा

नवी दिल्ली, 15 जानेवारी : इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर इन्सेन्टिव देत आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी...

Tsunami : टोंगामध्ये समुद्राखाली ज्वालामुखीचा उद्रेक; पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या त्सुनामीची शक्यता

<p>पॅसिफिक समुद्रातील टोंगा या ठिकाणी झालेल्या ज्वालामुखीमुळे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या त्सुनामीची शक्यता निर्माण झाली आहे. यूएस नॅशनल वेदर सर्व्हिसने या त्सुनामीचा इशारा...

Omicron वर मात केल्यानंतर शरीरात इम्युनिटी किती दिवस राहते? तज्ज्ञ काय सांगतात?

मुंबई, 16 जानेवारी : कोरोना विषाणूचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) भारतासह अनेक मोठ्या देशांमध्ये वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या या नवीन प्रकाराच्या प्रसाराचा...

सलमान खानला या अभिनेत्रीने घातली होती भुरळ, करणार होता लग्न; पण…

 अनेकवेळा सलमानला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

न्यूझीलंडजवळच्या टोंगा समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक; जपानला त्सुनामीचा तडाखा

Tonga Tsunami : न्यूझीलंडजवळ पॅसिफिक महासागरच्या किनारपट्टीवर असलेल्या टोंगामध्ये समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. टोंगामध्ये गेल्या 30 वर्षातील...