Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट Pakistan Financial Crisis : पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटात, चीन देणार 2.3 अब्ज...

Pakistan Financial Crisis : पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटात, चीन देणार 2.3 अब्ज डॉलरचे कर्ज 


Pakistan Financial Crisis : पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सातत्याने खालावत चालली आहे. आर्थिक परिस्थिती डबघाईला असलेल्या पाकिस्तानला या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत कर्ज करार करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे या करारानुसार चीनकडून पाकिस्तानला 2.3 अब्ज डॉलरचे कर्ज मिळू शकेल. पाकिस्तानच्या एका मीडिया आउटलेटने याबाबतची माहिती दिली आहे. देशाची बिघडत चाललेली आर्थिक स्थिती पाहता पाकिस्तानला काही दिवसांत चीनच्या बँकांच्या संघाकडून  2.3 अब्ज डॉललचे  कर्ज मिळण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, चीनचा बँक संघ आणि पाकिस्तानने आधीच  2.3 अब्ज डॉलरच्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली होती. पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांच्या हवाल्याने बुधवारी 22 जून रोजी या कराराची ताजी माहिती समोर आली आहे. 

मिफ्ताह इस्माईल म्हणाले, “या कर्ज करारांतर्गत काही दिवसांत पाकिस्तानात रोख चलण पोहोचणे अपेक्षित आहे. काल पाकिस्ताकडून या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर बँकांच्या चीनी संघाने आज पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाने (RMB) RMB 15 अब्ज म्हणजे  2.3 अब्ज डॉलर कर्ज मंजूर केले आहे.”   

“परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांचा दौरा आणि चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्याशी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर चीनने केवळ ही रोख रक्कम देण्यास सहमती दर्शवली नाही, तर हे कर्ज स्वस्त व्याजदराने दिले आहे, अशी माहिती अर्थमंत्री इस्माईल यांनी दिलीय. 

या कर्ज कराराबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी देखील सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. “मी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, परराष्ट्र मंत्री वांग यी आणि चीनच्या लोकांचा आभारी आहे. चीनी महासंघाने आज RMB 15 अब्ज कर्ज सुविधा करारावर स्वाक्षरी केली आहे, असे ट्विट भुट्टो यांनी केले आहे. 

दरम्यान, पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून या प्रकरणातील ही नवीन बाब पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (IMF) करार केल्याच्या अहवालानंतर समोर आली आहे.    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Pakistan #Financial #Crisis #पकसतन #गभर #आरथक #सकटत #चन #दणर #अबज #डलरच #करज

RELATED ARTICLES

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

आज आहे ‘वर्ल्ड चॉकलेट डे’; जगात सगळ्यात जास्त चॉकलेट कोण खातंय माहितेय का?

मुंबई, 07 जुलै : आजच्या युगात कोणताही सण-उत्सव असो, लोकांना चॉकलेट खायला आणि भेटवस्तू म्हणून द्यायला आवडतात. सणांच्या दिवशीही चॉकलेट खाण्याचा ट्रेंड झपाट्याने...

शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले

मुंबई, ०७ जुलै: रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे....

Most Popular

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

Mumbai : पोलीस दलातील बहुतांश पोलीस अधिकारी संजय पांडे निवृत्त होण्याची वाट पाहत होते? वाचा..

Mumbai Police : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची आता ईडी चौकशी सुरू झाली आहे. मंगळवारी ते...

फक्त ३७९ रुपयात खरेदी करा जबरदस्त साउंडचे ईयरफोन्स, १ वर्षाची वॉरंटी मिळेल

नवी दिल्लीः Cheapest Earphones: boAt Bassheads 100 in Ear Wired Earphones ला Amazon वरून ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. तुम्हाला...

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीला अपघात, घटनेचा थरारक Video समोर

औरंगाबाद, 6 जुलै : औरंगाबादमधून (Aurangabad) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे....

Prajakta Mali: ‘…यही मेरा इश्क है’, जुन्या आठवणींमध्ये रमली अभिनेत्री प्राजक्ता माळी

मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali Latest Photoshoot) हिने शेअर केलेले अनेक फोटोज व्हायरल होत असतात. 'रानबाजार' (Raanbaazaar) फेम ही अभिनेत्री सोशल मीडियावर...

Indian Railways Rule: रेल्वे बर्थ संदर्भात नवे नियम! प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, अन्यथा अडचण

नवी दिल्ली : Indian Railways Rule: तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तिकीट बुकिंगच्या वेळी, तुमच्याकडे बर्थ निवडीचा...