मुंबई : इंटरनेटवर दर दिवशी काही फोटो प्रचंड व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या या फोटोंचा अनेकदा तर आपल्या आयुष्याशी थेट संबंध नसतो. पण, तरीही हे फोटो आपण वारंवार पाहतो. आता आपण असं का करतो, ते प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतो. (Optical Illusion viral photos flamingoes sea horse)
वारंवार पाहिल्या जाणाऱ्या या फोटोंच्या गर्दीत एक प्रकारच्या फोटोंना बरीच पसंती दिली जाते. हे फोटो असतात Optical Illusion चे.
पालापाचोळ्यात दडलेला साप, झाडाच्या फांदीवर कुठेतरी दिसेनाशा अवस्थेत बसलेला पक्षी, रेषा- वर्तुळांची गुंतागूंत आणि बरंच काही या फोटोंमध्ये पाहायला मिळतं.
आपणंही बऱ्याच औत्सुक्यानं हे फोटो न्याहाळतो. त्यात दडलेल्या वस्तू, गोष्टी, प्राणी- पक्षी शोधण्याचा प्रयत्न करतो. असाच एक फोटो सध्या समोर आला आहे, जिथं फ्लेमिंगो पक्ष्यांची एकच गर्दी दिसत आहे.
फोटो म्हणण्यापेक्षा हे एक चित्र आहे असंच पाहताक्षणी लक्षात येत आहे. पाण्याच्या प्रवाहात, प्रवाहाच्या आजुबाजूला काही फ्लेमिंगो पक्षी असल्याचं या चित्रवजा फोटोमध्ये दिसत आहे. आता प्रश्न असा, की या फोटोमध्ये तुम्हाला कुठेही पाणघोडा लपलेला दिसतोय का?
लाख शोधूनही तुम्हाला हा पाणघोडा दिसणार नाही. कारण, पाण्यातच तो दडलाय. तिथं उजव्या कोपऱ्याला व्यवस्थित लक्ष द्या. पाण्यातच लपलेला हा जीव तुम्हाला लगेचच दिसेल.
उत्तर सापडल्यावर आनंद होतोय ना? पाहा हा फोटो तुमच्या मित्रांना पाठवून, घ्या त्यांची परीक्षा. पाहा त्यांना पाणघोडा मिळतोय का…
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Optical #Illusion #फलमगचय #गरदत #दडलय #पणघड #शधल #तर #जकल