Saturday, August 13, 2022
Home क्रीडा Olympics : चक दे! तब्बल चार दशकांनंतर भारतीय महिला हॉकी संघाची क्वार्टर...

Olympics : चक दे! तब्बल चार दशकांनंतर भारतीय महिला हॉकी संघाची क्वार्टर फायनलमध्ये धडक


Olympics : भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख असणाऱ्या हॉकी या खेळामध्ये सध्या देशाचा संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे. टोकियो येथे सुरु असणाऱ्या ऑलिम्पक स्पर्धेमध्ये खेळवण्यात आलेल्या हॉकी सामन्यांत भारताच्या महिला हॉकी संघानं बाजी मारत उपांत्य पूर्व फेरीमध्ये अर्थात क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

तब्बल चार दशकांनी, म्हणजेच 41 वर्षांनी भारताच्या महिला संघानं ही कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भारतीय महिला संघांनी 4-3 अशा फरकानं पराभूत केलं. ग्रुप ए मधील लीग सामने जिंकत भारतीय संघाने सहा गुण प्राप्त केले आहेत. आता भारताच्या संघापुढे ग्रुप बी मधील अग्रस्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचं आव्हान असेल. सोमवारी हा सामना खेळवण्यात येणार आहे. 

1980 मध्ये भारतीय संघानं मॉस्कोमध्ये आयोजित ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली होती. पण, संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. दरम्यान भारतीय संघातील वंदना कटारिया या खेळाडूच्या गोलची हॅट्रीक या सामन्यातील लक्षवेधी बाब ठरली. 4, 17 आणि 49 व्या मिनिटाला गोल करत तिनं क्रीडारसिकांच्या नजरा वळवल्या, ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Olympics #चक #द #तबबल #चर #दशकनतर #भरतय #महल #हक #सघच #कवरटर #फयनलमधय #धडक

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

प्रियांका आणि निकच्या जोडीबद्दल काय बोलून गेल्या नेटफ्लिक्सवरच्या सीमा टपारिया

मुंबई: प्रियांका चोप्रा आणि निक जोनस आदर्श जोडी समजली जाते. अनेक जणांचा ते दोघं आदर्श आहेत. प्रियांकानं फक्त अभिनय नाही,तर बिझनेसमध्येही आपलं नाव...

मुंबईकरांनो सावधान! शहरात एका दिवसात 79% कोरोनाचे रुग्ण वाढले

 आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

बाळूमामांचे बोल खरे ठरणार; दैवी सामर्थ्याने पाटलाचा अहंकार नष्ट होणार

मुंबई, 12 ऑगस्ट : महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक संतांनी मिळून महाराष्ट्र भूमी पावन बनवली आहे.  याच संत परंपरेमधील एक...

श्रावणात वरदलक्ष्मी व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे...

श्रावणात केले जाते जरा-जिवंतिकेचे पूजन; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

Jara Jivantika Puja 2022 : श्रावण (Shravan 2022) महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना. श्रावण महिन्याला सुरुवात...

दुसऱ्या पक्षातील आमदार कधी फोडलेत का? पकंजा मुंडेंनी दिलं बेधडक उत्तर

मुंबई, 11 ऑगस्ट :   झी मराठीवर नव्या सुरू झालेल्या बस बाई बस हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. अभिनेता सुबोध भावे सुत्रसंचालन...