Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनवर आज हायकोर्टात सुनावणी

Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनवर आज हायकोर्टात सुनावणी


Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी वादाच्या भावर्‍यात आडकलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांनी आता अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या हल्‍ल्या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं नितेश राणेसंह अन्य एकाचा अटकपूर्व  जामीन फेटाळला आहे. त्या निकालाल राणे यांच्यावतीनं अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्या अर्जावर न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांच्यासमोर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरेंना म्याँव म्याँव करून चिडवल्यानंतर अवघ्या काही तासांत हा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे निव्वळ राजकीय सूडबुद्धीनं आणि सरकारचा दबाव असल्यानं या प्रकरणात आपल्याला गोवलं जात असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी आपल्या अर्जात केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीच्या रणधुमाळीत सतिश सावंत यांच्या पॅनलचे निवडणूक प्रचारक संतोष परब यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला. हा हल्ला आमदार नितेश राणे यांच्या सांगण्यावर झाल्याचा आरोप करून तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केल्यानंतर अटकेची शक्यता निर्माण झाल्याने नितेश राणे आणि गोट्या सावंत यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावलेत. या अर्जावर दोन दिवस युक्तीवाद झाल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. 

काय आहे प्रकरण? 

18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहाअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Nitesh #Rane #भजप #आमदर #नतश #रणचय #अटकपरव #जमनवर #आज #हयकरटत #सनवण

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

केतकी चितळेचा ठाणे सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेचा (Ketaki Chitale) तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.  ठाणे सत्र न्यायालयाने केतकी चितळेचा जामीन...

Most Popular

Positive Baby Name : बाळाचं नाव ठेवताय? या सकारात्मक अर्थाच्या नावांचा नक्की विचार करा; जीवनात राहिल कायमच सकारात्मकता

बाळाचं नाव ठेवताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. अनेकदा पालक नावरस किंवा बाळासाठी शुभ असलेलं अक्षर नावासाठी निवडतात. यासोबतच जर तुम्ही सकारात्मक नावांचा...

PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा हॉट लूक; पाहा फोटो!

अनुष्का बहुतेक साध्या-सोबर लूकमध्ये दिसते. मात्र, यावेळी अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. (photo:anushkasharma/ig) अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

VIDEO : शिखर धवनला वडिलांनी बदडले, पंजाब Playoff मध्ये न गेल्यानं काढला राग!

मुंबई, 26 मे : पंजाब किंग्जला (Punjab Kings) या आयपीएल स्पर्धेची 'प्ले ऑफ' गाठण्यात अपयश आले. पंजाबच्या टीमनं काही चमकदार विजय मिळवत शेवटच्या...

पटिदारच्या शतकामुळे बंगळूरुची आव्हानात्मक धावसंख्या

कोलकाता : रजत पटिदारच्या (५४ चेंडूंत नाबाद ११२) कारकीर्दीतील पहिल्या शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुनी ‘आयपीएल’मधील एलिमिनेटर’च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध २० षटकांत ४...

दगडफेक आणि काठीने हल्ला करत नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड; धक्कादायक VIDEO

भोपाळ 26 मे : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात शहरातील चौकात असलेल्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू...

Smart Tv Offers: सॅमसंगची जबरदस्त डील, ‘या’ स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर फ्री मिळणार १.३२ लाखांचा स्मार्टफोन, पाहा ऑफर

नवी दिल्ली: Samsung Big TV Days Sale: नामांकित टेक कंपनी सॅमसंग आपल्या टीव्हीवर अतिशय आकर्षक ऑफर देत आहे . सॅमसंगच्या या ऑफर्स बिग...