Monday, July 4, 2022
Home क्रीडा Netflix : 'नेटफ्लिक्स' तोट्यात... 300 कर्मचार्‍यांना कामावरून काढलं

Netflix : ‘नेटफ्लिक्स’ तोट्यात… 300 कर्मचार्‍यांना कामावरून काढलं


Netflix Lays Off 300 Employees : लोकप्रिय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने (Netflix) चक्क 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. कंपनीला लागलेली घरघर याला कारणीभूत आहे. नेटफ्लिक्स कंपनीला झालेल्या तोट्यामुळे कंपनीने 300 कर्मचाऱ्यांना कामारून कमी केलं आहे. नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने गुरुवारी यासंदर्भात माहिती देत सांगितलं आहे की, ‘गेला काही काळ कंपनीला नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे, उत्पन्नात घट झाली आहे. आम्ही व्यवसायात लक्षणीय गुंतवणूक करत आहोत. परिणामी आगामी काळात खर्च वाढत जातील. यामुळे कंपनीनं कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे.’

कंपनीने वर्षाच्या मध्यात 300 कर्मचाऱ्यांनी कमी करताना म्हटलं आहे की, ‘कर्मचाऱ्यांनी नेटफ्लिक्ससाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि या कठीण काळात त्यांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.’ कंपनी कर्मचाऱ्यांमध्ये कपात केल्याने याचा परिणाम 3 टक्के कर्मचाऱ्यावर झाला आहे. नेटफ्लिक्समध्ये सुमारे 11 हजार कर्मचारी आहे.

एप्रिलमध्ये सबस्क्रायबर्समध्ये मोठी घट
एप्रिल महिन्यामध्ये सबस्क्रायबर्समध्ये मोठी घट झाल्याची नेटफ्लिक्स कंपनीने सांगितलं आहे. ही दशकातील सर्वात मोठी घट आहे. यामुळे वॉल स्ट्रीटवर मोठा परिणाम झाला. शेअर बाजारात नेटफ्लिक्सच्या गुंतवणूकदारांना अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झालं आहे. या वर्षी कंपनीचा स्टॉक अंदाजे 70 टक्क्यांनी घसरला आहे. नेटफ्लिक्सकडे सध्या 221.6 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत.

गेल्या महिन्यातही नेटफ्लिक्सने महसूल वाढ कमी झाल्याचं कारण देत 150 कामगारांना कामावरून काढून टाकलं. नेटफ्लिक्सकडून प्लॅटफॉर्म पुन्हा रुळावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

पासवर्ड शेअरींगमुळे कंपनीचं मोठं नुकसान
नेटफ्लिक्सच्या एका अकाऊंट आणि पासवर्डचा वापर अनेक युजर्स करत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पासवर्ड शेअरींगमुळे कंपनीच्या सबस्क्रायबर्समध्ये दशकातील सर्वात मोठी घट झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्याअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Netflix #नटफलकस #तटयत #करमचरयन #कमवरन #कढल

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

Most Popular

शुगर कंट्रोलमध्ये राहील; Diabetesअसणाऱ्यांना दुधाविषयी या गोष्टी माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 04 जुलै : दुधाला संतुलित आहार म्हणून ओळखले जाते. कारण त्यात सर्व पोषक घटक असतात. त्यामुळे लहानपणापासूनच दूध पिण्यावर भर दिला...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

आधी प्रेयसीला रुममध्ये केले बंद अन् नंतर प्रियकराने उचलले हे टोकाचे पाऊल

नोएडा, 3 जुलै : नोएडाच्या सेक्टर 49 मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका खासगी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीतील कर्मचाऱ्याचा मृतदेह (Dead...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...