Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या Nashik CNG Rate : नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून सीएनजी दरात ३ रुपयांनी वाढ

Nashik CNG Rate : नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून सीएनजी दरात ३ रुपयांनी वाढ


Nashik CNG Rate : नाशिककरांसाठी (Nashik) मोठी बातमी असून शहरात मध्यरात्रीपासून सीएनजीचे (CNG Rate Increased) दर प्रतिकिलो 3 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळं नाशिककरांना एक किलो सीएनजीसाठी 86 रुपये मोजावे लागणार आहेत. 

एकीकडे महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून दुसरीकडे सातत्याने जीवनावश्यक वस्तूच्या दरात वाढ होत आहे. किराणा, खाद्यतेल, भाजीपाला आदींच्या किमती गगनाला भिडत आहेत. दुसरीकडे पेट्रोल, डिझेल दर दिवसेंदिवस उच्चांक गाठत असताना यामध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. नाशिकमध्ये नैसर्गिक वायू अर्थात सीएनजीच्या दरात (CNG rates) तीन रुपयांची वाढ झाली आहे. शनिवारी (दि.21) सकाळी सहा वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळे आता पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किमतींबरोबर आता सीएनजी वाहन धारकांनाही अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

एकीकडे अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सीएनजीवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पेट्रोल, डिझेल महागल्याने अनेकांनी वाहने सीएनजी करण्यावर भर दिला. मात्र आता सीएनजी च्या दरातच वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. परिणामी पुन्हा एकदा लालपरीकडे नागरिकांची पाऊले वळू लागली आहेत. 

अशी झाली वाढ 
नाशिकमध्ये गेल्या दीड महिन्यात सीएनजीचे दर प्रतिकिलो 15 रुपयांनी वाढले असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशकात सीएनजीचे दर प्रतिकिलो 71 रुपये ऐवढे होते. आणि आता हेच दर 86 रुपयांवर पोहचल्यानं नाशिककरांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. याआधी सीएनजीचा दर हा 83 रुपये होता. मात्र पुन्हा एकदा भाववाढ झाल्याने नाशिकरांच्या खिशाला झळ बसणार असून वाढत्या महागाईने नाशिककर हैराण झाले आहेत. 

घरगुती गॅसही परवडेना! 

दरम्यान सर्वसामान्याना लागणाऱ्या जीवनाश्यक वस्तुमधील गॅसही महागला असून गृहिणींचे महिन्याचे नियोजन कोलमडले आहे. काही दिवसांपूर्वीच घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी गॅसचे (LPG Gas Price Hike) दर वाढवण्यात आले होते. 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले होते. 50 रुपयांची दरवाढ झाल्यानं आता सिलेंडरची किंमत 1003 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा महिला गॅसकडून चुलीकडे वळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Nashik #CNG #Rate #नशकमधय #मधयरतरपसन #सएनज #दरत #३ #रपयन #वढ

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Explained know about Coach Brendon Mccullum Bazball Tactics which were trending during India Vs England Edgbaston Test vkk 95

भारताविरुद्धचा निर्णायक कसोटी सामना जिंकून इंग्लंडच्या संघाने पाच सामन्यांची मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले आहे. एजबस्टन कसोटी सामन्यात चार सुरुवातीचे तीन दिवस पिछाडीवर...

रशिया-युक्रेनमधील लोकांची ज्योतिष्यांकडे धाव! “मार्च 2023 पर्यंत पुतिन…”

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याचं नाव घेत नाही. चार महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरु असून ते बंद होण्याची चिन्हे नाहीत. अस्वीकरण: ही कथा किंवा...

Ladki The Dragon Girl : रामगोपाल वर्मांचा ‘लडकी : ड्रॅगन गर्ल’ चीनमध्ये होणार प्रदर्शित

Ladki The Dragon Girl : सिनेनिर्माता रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत....

शरीरातील ‘हे’ मुख्य 4 बदल वेळीच ओळखा; Cholesterol वाढण्याचे देतात संकेत

मुंबई : अयोग्य जीवनशैलीमुळे चुकीच्या आहाराची आपल्याला सवय लागते. अशावेळी आपण असे अनेक पदार्थ खातो, ज्यामुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. वाईट...

वंध्यत्व, गर्भपात किंवा स्टील बर्थमुळे स्त्रियांना स्ट्रोकचा धोका अधिक, अभ्यासात झालं उघड

गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांमध्ये वंध्यत्व वाढत आहे. तसेच गर्भपाताच्या समस्या देखील वाढल आहे. वंध्यत्व आणि गर्भपात या दोन्ही गोष्टी शारीरिक आणि मानसिक नुकसान...

Pune Crime News: लोणी काळभोरमध्ये आढळला अज्ञात तरुणीचा मृतदेह; ओळख पटण्यासाठी पोलिसांचं आवाहन

Pune Crime News: पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 20 ते...