Friday, August 12, 2022
Home मुख्य बातम्या Nashik Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यातील 567 कोटींच्या कामांना ब्रेक, भुजबळांना दणका

Nashik Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यातील 567 कोटींच्या कामांना ब्रेक, भुजबळांना दणका


Nashik Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कामांचा सपाटा लावला आहे. सुरवातीला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला झटका दिल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ याना चागंलाच दणका दिला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या 567 कोटींच्या कामांना ब्रेक देऊन इतक्या घाईत कामांना मंजुरी कशासाठी असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला आहे. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतली. यानंतर एकनाथ शिंदे ऍक्टिव्ह झाले असून पहिलाच दणका त्यांनी भुजबळांना दिला आहे. छगन भुजबळ यांनी पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध कामांना मंजुरी दिली होती. मात्र या निधी वाटपावरून सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्षही पाहायला मिळाला होता. हा वाद थेट तत्कालीन मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांच्याकडेही गेला होता. त्यामुळे आता नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी सुहास कांदे यांच्या तक्रारीनंतर थेट या कामांनाच ब्रेक लावल्याने खळबळ उडाली आहे. 

छगन भुजबळ पालकमंत्री असताना जिल्ह्यातील कामांकरिता निधी वाटप करण्यात आला. या जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून भुजबळ आणि कांदे वाद चव्हाट्यावर आला होता. छगन भुजबळ हे ठेकेदारांना निधी विकत असल्याचा आरोप नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला होता. तसेच निधी वाटपावरून त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र आता सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सदर 567 कोटींच्या कामांना ब्रेक लावून घाई घाईत कामांना मंजुरी कशासाठी ? असा सवाल नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे. दरम्यान नव्या सरकारमध्ये असणाऱ्या सुहास कांदे यांनी निधी वाटपाचा हा वाद तक्रारीद्वारे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट या कामांनाचं ब्रेक लावल्याने भुजबळांना मोठा धक्का बसला आहे. 

नव्या सरकारचा दुसरा धक्का 
राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मिळून नवीन सरकार स्थापन केलं आहे. यानंतर नव्या सरकारने सगळ्यात पहिला धक्का शिवसेनेला दिला होता.  राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 चे कारशेड आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचं जाहीर केलं होतं. अशात आता एकनाथ शिंदे यांनी हा दुसरा धक्का दिला आहे. 

छगन भुजबळ आणि सुहास कांदे वाद 
जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्या हा वाद सुरु झाला होता. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये फेरफार होत असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी त्यावेळी केला होता. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळल होता. हा संघर्ष थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचला होता. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Nashik #Chhagan #Bhujbal #नशक #जलहयतल #कटचय #कमन #बरक #भजबळन #दणक

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

तांदळाचे दरही आता वाढणार?; भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट

वृत्तसंस्था, नवी दिल्लीमहागाईपाठोपाठ देशात तांदूळटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. चालू खरीप हंगामात पाच ऑगस्टपर्यंत देशातील भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट झाली असून, कमी...

Memes: रिषभ पंत १७ नंबरची जर्सी का घालतो? उर्वशी रौतेलाशी आहे खास कनेक्शन

पोस्टमध्ये काय म्हणाला रिषभ पंत?उर्वशीच्या या प्रकरणावर ऋषभ पंतने नाव न घेता खिल्ली उडवली. त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, “हे मजेदार आहे...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

JEE Advanced साठी अर्ज करण्याची आणखी एक संधी; IIT Bombay नं वाढवली मुदत

JEE Advanced 2022 : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे (IIT Bombay) आजपासून जेईई अॅडव्हान्ससाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख...

पुढील देशांतर्गत हंगामात अर्जुन गोव्याकडून खेळणार?; मुंबईकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुढील देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. २२ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज...

पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत....