Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या Nashik : नाशिकमधून एकाच दिवशी सहा मुली 'नॉट रीचेबल', अपहरणांच्या घटनांत वाढ

Nashik : नाशिकमधून एकाच दिवशी सहा मुली ‘नॉट रीचेबल’, अपहरणांच्या घटनांत वाढ
नाशिक: नाशिक शहरांतून गेल्या काही दिवसांपासून मुलींच्या अपहरणांच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. आज एकाच दिवशी तब्बल सहा मुलींचे अपहरण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिकमध्ये गुन्हेगारी कमी होण्याचं नाव घेत नाही. एकीकडे पोलीस धडक कारवाया करत आहेत तर दुसरीकडे त्याच दुप्पट गतीने नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. अशातच मुलींचे अपहरण ही चिंतेची बाब ठरत आहे. रोज एक ना एक मुलीचे अपहरण नित्याचे झाले आहे. आज तर तब्बल सहा मुलींचे अपहरण झाल्याने नागरिकांमध्ये भीती आहे.

पहिली घटना नाशिक शहरातील शालिमार येथे घडली असून मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार त्यांची मुलगी शालिमार येथील श्वेता बॅगल्ससमोर उभी असताना अज्ञात इसमाने तिला पळवून नेल्याचे भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.

तर भद्रकाली परिसरात अपहरणाची दुसरी घटना घडली. जीपीओ पाठीमागील पंचशील नगर येथून आईच्या जवळून सदर मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याची फिर्याद भद्रकाली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

अपहरणाचा तिसरा प्रकार शहरातील राणाप्रताप चौकाजवळ घडला. फिर्यादी महिलेने म्हटले की 15 वर्षीय मुलगी क्लासला गेली, ती अजून आलीच नाही, त्यामुळे कुणीतरी फूस लावून पळवून नेले म्हणून अंबड पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. चौथा प्रकार हा अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडला. अंबड येथील स्वामीनगर येथे राहणाऱ्या मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याचे फिर्याद करण्यात आली आहे.

अपहरणाची पाचवी घटना लेखानगर परिसरात घडली आहे. आईने दिलेली फिर्यादीत म्हटले आहे की, मुलीला सकाळी कॉलेजला जाण्यासाठी रिक्षात बसवून दिले होते, मात्र कॉलेजची वेळ संपूनही ती अद्याप घरी न आल्याने अपहरणाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सहावी घटना भगूर परिसरात घडली. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार भगूर येथील शाळेत मुलीला पाठविले असता शाळा सुटुनही ती घरी परतली नाही, सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नसल्याने अपहरणाची फिर्याद देवळाली कॅम्प पोलिसांत करण्यात आली आहे.

अपरणांच्या घटनांत वाढ
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातून अपरणांच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी निर्भया पथक नेमले आहे. मात्र अशा पद्धतीने मुलींचे अपहरण होत असतांना पथक करतंय असा सवाल सध्या उपस्थित होतो आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Nashik #नशकमधन #एकच #दवश #सह #मल #नट #रचबल #अपहरणचय #घटनत #वढ

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

OnePlus Nord 2T 5G आज भारतात लॉंच; 80W चार्जिंग MediaTek Dimensity सह खास फिचर्स, जाणून घ्या

OnePlus Nord 2T 5G Launched : OnePlus Nord 2T 5G भारतीय बाजारपेठेत आज 1 जुलै रोजी शुक्रवारी...

तलावाच्या मध्यात बुल्डोजरला लटकून स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, दोरी फिरु लागली आणि… पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. तर येथे आपल्याला स्टंट संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात....

४ जुलैला येतेय नवीन शाओमी बँड, मोठ्या डिस्प्लेसह खूप सर्व नवे फीचर्स

नवी दिल्लीः Xiaomi ने नुकतीच चीन आणि यूरोपीय बाजरात मोठी डिस्प्ले, जास्त वॉच फेस आणि जबरदस्त हेल्थ ट्रॅकिंग सारखे अपग्रेड सोबत Mi Band...

श्रीलंकेला लोळवत टीम इंडियाला दिला धक्का; ऑस्ट्रेलियाने घेतली निर्णायक आघाडी

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ चा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाईल हे नंतर ठरवले जाईल, पण ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध १० विकेट्सने मिळवलेल्या...

Mouth Ulcers : तुम्ही देखील तोंड येण्याच्या समस्येनं त्रस्त आहात? मग ‘हा’ उपाय नक्की करुन पाहा

तसे पाहाता अल्सर येणं हे नॉर्मल असलं तरी यावर वेळेवर उपचार न केल्यास ते कर्करोगाचेही कारण बनू शकते. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

Pune Water Issue : पुणे शहरात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा ABP Majha

पुणे शहरात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार. खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेचा निर्णय. यापूर्वीच प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर.

अस्वीकरण:...