Thursday, May 26, 2022
Home भारत Mundka Fire : अग्निकांडात देवदूत बनले क्रेन ड्रायव्हर, 50 हून अधिक जणांचा...

Mundka Fire : अग्निकांडात देवदूत बनले क्रेन ड्रायव्हर, 50 हून अधिक जणांचा वाचवला जीव


Delhi Mundka Fire : दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशन जवळील इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली, नंतर ती आग तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरली. या अग्नितांडवादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक क्रेन आगीत अडकलेल्या लोकांचा जीव वाचवताना दिसत आहे.

एबीपीने क्रेन चालकांसोबत संवाद साधला. क्रेन चालक अनिल तिवारी आणि दयानंद तिवारी हे दोघे 25 वर्षांपासून या कामात कार्यरत आहेत. या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी चाप वाजेच्या सुमारात दोघे या परिसरातून जात असताना त्यांना समोरील इमारतीला आग लागून धुराचे लोट बाहेर पडताना दिसले. त्यानंतर या क्रेन चालकांनी इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना आगीतून बाहेर काढण्याचं काम सुरु केलं. क्रेन चालकांची डिवायडर तोडून रस्त्याच्या पलिकडे आग लागलेल्या इमारतीजवळ पोहोचले.

50 हून अधिक जणांचा वाचवला जीव
आग लागलेल्या इमारतीजवळ पोहोचताच तिथे लोक मदतीसाठी आरडाओरडा करत होते. पहिल्या मजल्यावर अग्नितांडव दिसत होते. तर दुसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर पडत होते. त्यानंतर त्यांनी क्रेनचा वापर करत दुसऱ्या मजल्यावरील काचा फोडल्या आणि अडकलेल्या सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. इमारतीमध्ये अडकलेल्यांमध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त होती. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने बचावकार्य करत महिला आणि मुलांना बाहेर काढायला सुरुवात केली. दिड तास चाललेल्या या बचावकार्यामध्ये क्रेन चालकांनी 50 हून अधिक महिलांची सुखरुप सुटका केली.

क्रेनमधून अधिक लोकांना वाचवणे शक्य नव्हतं : क्रेन चालक
दरम्यान, आग अधिक वाढल्याने क्रेन चालकांनी तेथून पळ काढला. आग जास्त पसरल्याने क्रेनने लोकांना मदत करणे शक्य नव्हतं. आगीचे लोट दूरवर पसरू लागल्या. क्रेन चालक आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तोपर्यंत पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचलं होतं मात्र अग्निशमन दलाचं पथक तेथे पोहोचलं नव्हतं. क्रेनचे मालक सुधीर कुमार यांनी सांगितले की, क्रेन चालकांना शक्य होतं तोपर्यंत त्यांनी लोकांना वाचवलं.

महत्त्वाच्या इतर बातम्याअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Mundka #Fire #अगनकडत #दवदत #बनल #करन #डरयवहर #हन #अधक #जणच #वचवल #जव

RELATED ARTICLES

सलग 13 तासांच्या चौकशीत ईडीने काय प्रश्न विचारले? अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 26 मे : ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब...

Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; इतकं मिळालं Hike

मुंबई, 26 मे: जगभरातील टॉप कंपन्या आणि त्यांच्या CEO ना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपल्याला माहितीच आहे. या कंपन्यांमध्ये अनेक IT कंपन्यांचा नंबर लागतो. यामध्ये...

तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पुरेसे संरक्षण देते का?

Health Insurance Policy : वर्षागणिक वैद्यकीय खर्चात वाढ होत असल्याने पॉलिसीधारकाने त्यांच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी (आरोग्य विमा पॉलिसी)ची...

Most Popular

VIDEO : शिखर धवनला वडिलांनी बदडले, पंजाब Playoff मध्ये न गेल्यानं काढला राग!

मुंबई, 26 मे : पंजाब किंग्जला (Punjab Kings) या आयपीएल स्पर्धेची 'प्ले ऑफ' गाठण्यात अपयश आले. पंजाबच्या टीमनं काही चमकदार विजय मिळवत शेवटच्या...

IPL 2022 : रजतचं शतक राहुलवर भारी, लखनऊला धक्का, RCB फायनलच्या आणखी जवळ

कोलकाता, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022 Eliminator) एलिमिनेटरमध्ये आरसीबीने लखनऊ सुपर जाएंट्सना (RCB vs LSG) पराभवाचा धक्का दिला आहे, त्यामुळे...

टेरर फंडिंग प्रकरणात यासिन मलिकला जन्मठेप; वाचा मलिकवरील कारवाईची संपूर्ण टाईमलाईन

Yasin Malik Timeline : काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. एनआयए कोर्टाने...

बॉसचा झाला तिळपापड, इतका कशाचा आला राग की थेट नाक फुगवून बसायची आली वेळ?

मुंबई 25 मे: अभिनेत्री भाग्यश्री लिमये (Bhagyashree Limaye) सध्या बॉस माझी लाडाची या मालिकेत (Boss mazi ladachi) खडूस पण गोड अश्या बॉसच्या भूमिकेत...

तुम्हालाही डायबिटीस आहे का? मग ‘या’ भाज्या खाणं टाळाच

मधुमेहाच्या रुग्णांना अशा आहारापासून दूर राहावे लागते ज्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकते.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...