Saturday, August 13, 2022
Home भारत Mumbai Dreams : कर्कश आवाजासह नियमांचा फज्जा; संसदेपासून 500 मीटरवर रंगला बारबालांचा...

Mumbai Dreams : कर्कश आवाजासह नियमांचा फज्जा; संसदेपासून 500 मीटरवर रंगला बारबालांचा धांगडधिंगा


नवी दिल्ली 04 : देशभरात कोरोनानं (Coronavirus) अक्षरशः हाहाकार माजवला असताना देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) मात्र भलतंच चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत अनेकदा तुम्ही बारबालांबद्दल ऐकलं आणि पाहिलंही असेल. मात्र, कोरोना काळात हाच प्रकार दिल्लीतील पंचकुइया रोड आणि पहाडगंज परिसरातील बारमध्ये घडताना दिसला आहे. विशेष बाब म्हणजे संसदेपासून अवघ्या 500 मीटर अंतरावरील बारमध्ये गाण्याच्या मोठ्या आवाजात या बारबाला (Barbara Dance Bar) अंगप्रदर्शन करत होत्या.

हे दृश्य एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाची पुरती भंबेरी उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणीही हा प्रकार थांबवत नसून त्यावर काही कारवाईही केली जात नाहीये. त्यामुळे हा सर्व प्रकार नेमका कोणाच्या इशाऱ्यावर उघडपणे सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 24 जुलै रोजी कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांनुसार, बारमध्ये काही बारबाला अंगप्रदर्शन करत होत्या. तर, अनेक गिऱ्हाईकं त्यांच्यावर नोटांचा अक्षरशः पाऊस पाडत होते. तर, काहीजण टेबलवर बसून हुक्का ओढत होते. लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

इमारतीवरून नवजात बालिकेला फेकलं; विरारमधील क्रूरतेचा कळस गाठणारी घटना
दिल्लीमध्ये सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्यानं अनेक मोठमोठे नेते, मंत्री आणि खासदार याठिकाणी आहेत. अशात संसदेपासूनअवघ्या 500 मीटर अंतरावर हा सर्व प्रकार सुरू होता. विशेष बाब म्हणजे, अगदी मोठ्या आवाजात गाणी लावून हे सर्व सुरू होतं. अशात हा आवाज कोणालाच ऐकू गेला नाही का? असाही प्रश्न उपस्थित होतो. बारबाहेर असलेल्या बाउन्सरला बारचं नाव विचारलं असता त्यानं मुंबई ड्रीम्स असं सांगितलं. सध्या बारचं नाव बदलायचं असल्यानं याठिकाणचा बोर्ड काढण्यात आला होता. तसंच एकाच हॉटेलमध्ये तीन बार सुरू होते आणि तिन्ही ठिकाणी बारबालांचा डान्स सुरू होता.

‘अमरावतीत येताना..’; रिव्हॉलवरचा गैरवापर भोवला, VIDEO VIRAL होताच पोलीस निलंबित

याठिकाणी आतमध्ये प्रचंड गर्दी, कोणाच्याच तोंडाला मास्क नाही, ना सोशल डिस्टन्सिंग आणि ना कोरोनाच्या कुठल्या नियमांचं पालन केल्याचं दिसून आलं. बारच्या मालकानं सांगितलं, की काहीही टेन्शन न घेता मज्जा करा. इथला कुठलाही व्हिडिओ बाहेर जाणार नाही आणि प्रशासनाचं कोणीही आत येणार नाही. अशात या प्रकाराला जबाबदार कोण? आणि हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावर सुरू आहे, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Mumbai #Dreams #करकश #आवजसह #नयमच #फजज #ससदपसन #मटरवर #रगल #बरबलच #धगडधग

RELATED ARTICLES

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे....

Most Popular

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....

पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे....