<p>मुंबईत एका दारुड्यानं पत्नीला घरी बोलावण्यासाठी चक्क मुलांच्या मृत्यूचा बनाव रचला. मालाडमधल्या कुरार इथं हा धक्कादायक प्रकार घडला. दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी गावी होती. सुचित गौड नावाच्या या आरोपीनं काही दिवसांपूर्वी गावी जाऊन १३ वर्षांची मुलगी आणि ८ वर्षांच्या मुलाला मुंबईत आणलं होतं. पत्नीला परत आणण्य़ासाठी त्यानं मुलांच्या मृत्यूचा बनाव रचला. मुलगा झोपला असताना त्याच्यावर सफेद कपडा टाकून फोटो काढला आणि मुलीला बादलीवर चढवून पंख्याला फास लावून फोटो काढला आणि तो पत्नीला पाठवण्याचा त्याचा विचार होता. पण मुलगी रडू लागल्यानं शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला आणि हा प्रकार उघड झाला</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Mumbai #Crime #पतनल #घर #बलवणयसठ #दरडयन #रचल #मलचय #मतयच #बनव #ABP #Majha