कबीर मुल्ला, अजमल कुरेशी, अफजल कुरेशी, मनोज व्यास, सादीक शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. संबंधित आरोपी विरोधांत 6 जुलै रोजी मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. पण शुक्रवारी सर्व आरोपी तुरुंगातून सुटले होते.
हेही वाचा-मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट करणं पडलं महागात, बीडच्या तरुणाला अटक
संबंधित आरोपींच्या स्वागतासाठी काही जणांनी 8 दुचाकीवरून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये 25 ते 30 तरुणांचा सहभाग होता. या घटनेचा माहिती मालवणी पोलिसांना मिळताच त्यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याच्या गुन्ह्यात पाच जणांना पुन्हा अटक केली आहे. त्यामुळे तुरुंगाच्या बाहेर आल्यानंतर जंगी स्वागत करणं संबंधित आरोपी तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर, काही मिनिटांतच आरोपींना पुन्हा गजाआड व्हावं लागलं आहे.
हेही वाचा-लव्ह, सेक्स आणि धोका! पुण्यात लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार; HRचा कांड उघड
काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार पुण्यात देखील घडला होता. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर शेकडो समर्थकांनी त्याच्या स्वागतासाठी आलिशान गाड्यांचा फौजफाटा तैनात केला होता. यामुळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करत, गजा मारणे टोळीच्या अनेकांची उचलबांगडी केली होती.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Mumbai #आरपचय #सवगतसठ #मरवणक #कढण #पडल #महगत #कह #मनटतच #पलसन #पनह #कल #गजआड