Sunday, January 16, 2022
Home लाईफस्टाईल Motivational Weight Loss Story : बापरे, 207 किलो वजन असलेल्या जुनैदला वडिलांनी...

Motivational Weight Loss Story : बापरे, 207 किलो वजन असलेल्या जुनैदला वडिलांनी दिला शेवटची ताकिद, फक्त 10 महिन्यांत घटवलं तब्बल 100 किलो वजन!


सहसा लोक वजन कमी करताना लहान लहान ध्येयेच ठेवतात. बहुतेक लोकांना फक्त 5 ते 10 किलो वजनच कमी करायचे असते. त्याचवेळी असे काही लोक असतात ज्यांना 20 ते 30 किलोग्रॅम वजन कमी करायचे असते. याशिवाय लोक यापेक्षा जास्त वजन कमी करण्याचा विचारही करत नाहीत आणि ते असे काही करूही शकत नाहीत. पण असं म्हणतात ना की माणसाने एखाद्या गोष्टीची जिद्द ठेवली आणि त्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी चिटकून राहिला तर तो सर्व काही करू शकतो. जुनैद जमादारच्या आयुष्यातही असंच काहीसं घडलं. जुनैदकडे लोक अनेकदा विचित्र नजरेने बघायचे. याचे कारण म्हणजे त्याचे भरभक्कम शरीर. जुनैदचे वजन सुमारे 207 किलोवर जाऊन पोहचले होते.

त्यामुळे लोक त्याला उलटसुलट टोमणे मारत असतं. अशा स्थितीत एके दिवशी जुनैदच्या वडिलांनी त्याला अल्टिमेटम देऊन वजन कमी करण्यास सांगितले. यानंतर २६ वर्षीय जुनैदने मागे वळून पाहिलेच नाही. यासोबतच त्याने आहार आणि व्यायामाच्या माध्यमातून तब्बल 100 किलो वजन कमी केले आहे. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर चला जाणून घेऊया जुनैदच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी.

 • नाव – जुनैद रियाजहमाद जमादार
 • व्यवसाय – हॉटेल
 • वय – 26 वर्षे
 • उंची – 5 फूट 11 इंच
 • शहर – इचलकरंजी, महाराष्ट्र
 • सर्वाधिक वाढलेले वजन – 207.03 किलो
 • कमी केलेले वजन – 100 किलो
 • वजन कमी करण्यासाठी लागलेला वेळ – 10 महिने

(फोटो साभार: TOI)

असा झाला वेटलॉसचा प्रवास सुरू

जुनैद म्हणतो की तो त्याच्या वयाच्या मानाने खूप लठ्ठ होता आणि एकप्रकारे आरोग्याशी खेळत होता. त्यामुळे त्याचे वडीलही चिंतीत होते. यावर जुनैदच्या वडिलांनी त्याला सांगितले होते की, त्याने आयुष्यात काहीही केले नाही तरी चालेल आणि ते कोणत्याही परिस्थितीत त्याला साथ देतील पण त्याने वजन कमी करून दाखवले पाहिजे. वडिलांच्या या शब्दांचा जुनैदवर खोलवर परिणाम झाला आणि त्याने आपले आयुष्य 360 डिग्रीने बदलण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले. ज्याची सुरुवात डाएट आणि व्यायामाने झाली.

(वाचा :- सुश्मिता सेन तब्बल 4 वर्षे देत होती ‘या’ जीवघेण्या भयंकर आजाराशी झुंज आणि मग पुढे..!)

असं होतं डाएट

3 उकडलेली अंडी आणि एक संत्र

 • दुपारचे जेवण –

1 चपाती, 200 ग्रॅम उकडलेले चिकन, सॅलेड आणि लस्सी

 • रात्रीचे जेवण –

200 ग्रॅम उकडलेले चिकन

 • व्यायामाआधीचे मील –

1 सफरचंद, 5 बदाम, 2 अक्रोड

 • व्यायामानंतरचे मील –

प्रोटिन स्कूप, 3 अंड्याचा सफेद भाग

बिर्याणी, पंजाबी डिश, साउथ इंडियन डिश, आईस्क्रीम

 • लो कॅलरी फूड –

जुनैद सांगतो की त्याची आई त्याच्यासाठी जेवण बनवायची. अशा परिस्थितीत कोणती गोष्ट सर्वात कमी-कॅलरी होती याची त्याला कल्पना नाही.

(वाचा :- World Aids Day 2021 : ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, असू शकतात एड्सचे सुरूवातीचे संकेत, असा करा बचाव!)

वर्कआउट

जुनैद सांगतो की, तो जिममध्ये जाऊन डबल मसल्सचा व्यायाम करायचा. याशिवाय तो बरेच तास कार्डिओ आणि फ्री हँड एक्सरसाइजही करत असे.

 1. सोमवार – शोल्डरआणि थाई
 2. मंगळवार – चेस्ट आणि ट्राइसेप्स
 3. बुधवार – बॅक आणि बायसेप्स

(वाचा :- बापरे, सायलेंट किलर असतात ‘हे’ 6 आजार, हळू हळू करतात शरीरावर कब्जा व देतात मृत्यूला आमंत्रण, असा करा बचाव..!)

फिटनेस सीक्रेट

जुनैदच्या म्हणण्यानुसार वजन कमी करण्यासाठी तो प्रत्येक जेवणानंतर 10 ते 15 मिनिटे फिरायला (walk) जायचा. याशिवाय तो झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायचा. ग्रीन टी मुळे चयापचय क्रिया सुधारते. याशिवाय तो चेस्ट आणि थाई मध्ये 300 रॅप्स करायचा.

(वाचा :- सडपातळ बांधा आणि सपाट पोटासाठी अनुष्का शर्मा नाश्त्यात खाते ‘हे’ खास घरगुती पदार्थ, हे आहेत फायदे!)

जीवनशैलीत केले हे बदल

जुनैदच्या म्हणण्यानुसार, त्याने आपले ध्येय साध्य करण्यासाठी काही सवयी बदलल्या आणि चांगल्या सवयी लावून घेतल्या. त्यातील पहिला म्हणजे रोजचा व्यायाम. याशिवाय खाण्याच्या सवयी बदलल्या आणि लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावली.

(वाचा :- Corona new Omicron variant : करोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची ‘ही’ भयंकर लक्षणं घेऊ नका हलक्यात, या लोकांना आहे सर्वाधिक धोका!)

Note – वर सांगितलेला अनुभव हा तुमच्यासाठी सुद्धा लाभदायक असेलच असे नाही. त्यामुळे वरील टिप्स जशाच्या तशा फॉलो न करता तज्ज्ञ व जाणकारांचा सल्ला घ्या आणि तुमच्या शारीरिक स्थितीनुसार योग्य डाएट आणि वर्कआउट प्लान तयार करूनच वजन कमी करण्याचा प्रवास सुरु करा.

(हा लेख इंग्लिशमधून वाचण्यासाठी येथे क्लिक करा)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Motivational #Weight #Loss #Story #बपर #कल #वजन #असललय #जनदल #वडलन #दल #शवटच #तकद #फकत #महनयत #घटवल #तबबल #कल #वजन

RELATED ARTICLES

Virat Kohli च्या राजीनाम्यानंतर भावूक झाली पत्नी अनुष्का, म्हणाली…

नवी दिल्ली, 16 जानेवारी: भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी आपल्या सोशल अकाऊंटवर भावुक...

WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुम्हीही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स WhatsApp द्वारे कोणत्याही युजरची फसवणूक करू...

TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 16 जानेवारी 2022 : ABP Majha

<p>देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा, राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स टॉप 25 न्यूज बुलेटीनमध्ये...</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Most Popular

पुन्हा एकदा नवं काही…

|| गायत्री हसबनीस समांतर धाटणीचे हिंदी चित्रपट करणारी अभिनेत्री शेफाली शहा इतर अभिनेत्रींपेक्षा काहीशी वेगळी आहे, अशी धारणा समीक्षकांसह इंडस्ट्रीत आहे. अनेक हिंदी मालिका,...

‘तें – एक श्राव्य अनुभव’

‘तेंडुलकरांचे साहित्य कोणत्याही माध्यमात सहजपणे रूपांतरीत करता येते. मानसशास्त्र समजून घ्यायचे असेल तर तेंडुलकराच्या पात्राचा अभ्यास करण्यासारखा आहे. कारण त्यांच्या साहित्यातून ‘माणूस’ समजतो....

न्यूझीलंडजवळच्या टोंगा समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक; जपानला त्सुनामीचा तडाखा

Tonga Tsunami : न्यूझीलंडजवळ पॅसिफिक महासागरच्या किनारपट्टीवर असलेल्या टोंगामध्ये समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. टोंगामध्ये गेल्या 30 वर्षातील...

कोहलीच्या निर्णयाचं मला आश्चर्य वाटलं नाही, सुनील गावस्कर यांचं मोठं विधान

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील दारूण पराभवानंतर विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

महिला कलाकारांसोबत गैरवर्तवणूक, समज देऊनही शिस्तभंग; अभिनेते किरण माने प्रकरणी स्टार प्रवाहचे स्पष्टीकरण

दरम्यान या संपूर्ण प्रकरणी स्टार प्रवाह वाहिनीने सविस्तर निवदेन दिले आहे. अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कोणतीही पूर्वसूचना...

ईशा गुप्ताने ब्रालेस फोटोशुटनंतर बेडरूमधील टॉपलेस फोटो केला शेअर

मुंबई, 15 जानेवारी - बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला (Esha Gupta) काही दिवासापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. मात्र याहीपेक्षा ती सध्या तिच्या बोल्ड फोटोशुटमुळे...