Friday, May 20, 2022
Home भारत Monsoon 2022 : खुशखबर!  15 मे रोजी मान्सून अंदमानात होणार दाखल, पहिल्या...

Monsoon 2022 : खुशखबर!  15 मे रोजी मान्सून अंदमानात होणार दाखल, पहिल्या हंगामी पावसाची शक्यता  


Monsoon News : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे लाही-लाही होत असताना आता दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नैऋत्य मान्सून  (Monsoon 2022)  देशात वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो. अंदमान आणि निकोबार बेटांवर 15 मे रोजी पहिला हंगामी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, नैऋत्य मान्सून 15 मे रोजी  दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. 

हवामान शास्त्रज्ञांच्या मते, पूर्व मॉन्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून मान्सून आधी केरळ आणि नंतर उत्तरेकडे सरकेल. केरळमध्ये मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होतो. परंतु, यंदा वेळेआधी म्हणजे 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. पोषक वातावरण राहिल्यास पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे.

  

अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 14 ते 16 मे दरम्यान द्वीपसमूहात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 15 आणि 16 मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रावर 40 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याची शक्यता आहे. 

नैऋत्य मान्सूनमुळे देशात 70 टक्के पाऊस  

साधारणपणे मान्सूनची सुरूवात केरळपासून होते आणि नंतर तो हळूहळू देशभर पसरतो. त्यामुळे देशातील एकूण पावसापैकी 70 टक्के पाऊस नैऋत्य मान्सूनमधून पडतो. भारतातील निम्मी रब्बी पिके या मान्सूनवर अवलंबून आहेत.  

दरम्यान, काही राज्यांमध्ये पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत तीन दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. हमाना विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारी दिल्लीत कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 16 मे रोजी तापमानात किंचित घट होणार असून कमाल तापमान 42 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

महत्वाच्या बातम्या

Monsoon 2022 : खुशखबर… मान्सून वेळेआधीच धडकणार, 27 मे रोजी केरळमध्ये आगमन होणार

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Monsoon #खशखबर #म #रज #मनसन #अदमनत #हणर #दखल #पहलय #हगम #पवसच #शकयत

RELATED ARTICLES

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

Most Popular

प्राजक्ताचा रानबाजार नंतरचा ‘तो’ फोटो चर्चेत, फॅन्स विचारत आहेत, ‘ आता हे काय ‘

मुंबई, 19 मे- अभिनेत्री प्राजक्ता माळी( Prajakta Mali ) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांची मुख्य भूमिका असलेला ‘रानबाजार’ या (RaanBaazaar Trailer) वेबसिरीरीजचा...

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखतची सोनेरी मोहोर | World Boxing Championship Nikhat Golden Bloom Indian boxer Gold medal World Boxing Championships ysh 95

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने (५२ किलो) इस्तंबुल येथे झालेल्या १२व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक...

बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करतोय ज्युनियर एनटीआर!

Jr. NTR Birthday : साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार ज्युनियर एनटी रामाराव अर्थात ज्युनियर एनटीआर (Jr. NTR ) आज (20...

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...