Monkeypox Outbreaks : गेल्या दोन वर्षांपासून, संपूर्ण जग आधीच कोरोना (Corona) महामारीने हैराण झाले आहे आणि लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, दरम्यान आफ्रिकेतून उद्भवलेल्या मंकीपॉक्स सारख्या नवीन रोगामुळे शास्त्रज्ञांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. जाणून घेऊया सविस्तर
आफ्रिकामध्ये मंकीपॉक्सचा उद्रेक
आफ्रिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे कार्यकारी संचालक अहमद ओगवेल ओमा म्हणाले की, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, नायजेरिया, कॅमेरून आणि मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये याचा उद्रेक दिसून आला आहे. युनायटेड किंगडम, पोर्तुगाल, स्पेन आणि युनायटेड स्टेट्समध्ये व्हायरसची वाढती रुग्णसंख्या दिसून आली आहे. ज्यामध्ये तापाची लक्षणे आणि मानवाच्या शरीरावर विशिष्ट प्रकारचे पुरळ आढळून आले आहेत. हा रोग, संपर्कातून पसरतो आणि माकडांमध्ये प्रथम आढळला होता, हा रोग बहुतेक पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत आढळतो. ओमाने न्यूज ब्रीफिंगमध्ये सांगितले की, “आम्ही अपेक्षा करतो की असे उद्रेक येतील, जे आम्ही नेहमीच्या पद्धतीने हाताळू,” तसेच आम्ही बाहेरील अनेक देशांबद्दल चिंतित आहोत, विशेषत: युरोपमध्ये, जे मंकीपॉक्सचे उद्रेक पाहत आहेत,” ते पुढे म्हणाले. “या उद्रेकांचे मूळ स्त्रोत काय आहे, याबद्दलचे ज्ञान सार्वजनिक करणे आवश्यक आहे.
मानवाकडून प्रसार होण्याची क्षमता मर्यादित
आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की, या विषाणूचा मानवाकडून मानवात प्रसार होण्याची क्षमता मर्यादित आहे आणि त्याची प्रसार साखळी 6 पिढ्यांची आहे. म्हणजेच, या विषाणूचा मूळ बळी पडलेला एक व्यक्ती पहिल्या पाच लोकांना संसर्ग करू शकला नाही, परंतु सहाव्या व्यक्तीला याची लागण झाली. त्यामुळे त्याच्या प्रसाराचा वेग खूपच कमी आहे. डॉ. कॉलिन ब्राउन, यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) मधील क्लिनिकल आणि इमर्जिंग इन्फेक्शन्सचे संचालक म्हणाले की, ‘मंकीपॉक्स लोकांमध्ये सहज पसरत नाही आणि सामान्य लोकांना धोका खूप कमी आहे यावर जोर देणे महत्त्वाचे आहे. ‘
काय आहेत लक्षणे?
तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.
कसा वाढतो संक्रमणाचा धोका?
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्स रोगावर सध्या कोणतेही अचूक उपचार नाहीत. या रोगाची लागण झाल्यावर, लक्षणे कमी करण्यासाठी रुग्णावर उपचार केले जातात. मंकीपॉक्स रोखण्यासाठी कांजण्यांवरचे लसीकरण 85 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Monkeypox #Outbreaks #आफरकत #मकपकसच #उदरक #नवन #रगमळ #शसतरजञसमर #आवहन