Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या Mega Block : मुंबईत रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक, पाहा संपूर्ण...

Mega Block : मुंबईत रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक, पाहा संपूर्ण वेळापत्रक 


Mega Block : रविवारी म्हणजे 15 मे रोजी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. देखभालीच्या आणि काही तांत्रिक कामांसाठी 15 मे रोजी रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक (Mumbai railway mega block) घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने ट्विट करून या मेगा ब्लॉकबाबतची माहिती दिली आहे. 

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत वाहतूक किमान 15 मिनिटे उशिराने असणार आहे. पर्याय म्हणून धीम्या मार्गाची सर्व वाहतुक जलदगतीच्या मार्गावर वळवण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस मुंबई येथून सकाळी 10 . 14 ते दुपारी 3.32 या वेळेत सुटणाऱ्या उपनगरीय धीम्या गाड्या माटूंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलग मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या, शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड स्थानकावर थांबतील. त्यानंतर मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने आपल्या निश्चित थांब्यावर पोहोचतील. 

ठाणे येथून सकाळी 10. 58 ते दुपारी 3. 59 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील उपनगरीय गाड्या मुलुंड स्थानकापासून अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबून पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील व नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा आपल्या निश्चित स्थानकांवर पोहोचलीत. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.54 या वेळेत पनवेल/ बेलापूर/ वाशीसाठी सुटणाऱ्या गाड्या हार्बर मार्गावरील आणि पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून सकाळी 10. 16 ते दुपारी 3.47 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या उप हार्बर मार्गावरील गाड्या बंद राहतील. 

मेगा ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला,  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल, वाशी पनवेल या विभागादरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. शिवाय ब्लॉक कालवधीत हार्वर मार्गावरील प्रवाशांना ठाणे, वाशी/ नेरूळ स्थानकांतून सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.  

रविवारी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान 10.34 ते 3.35  वेळेत जलद मार्गांवर जंबो ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील.  

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Mega #Block #मबईत #रववर #रलवचय #तनह #मरगवर #मग #बलक #पह #सपरण #वळपतरक

RELATED ARTICLES

वर्षभरापूर्वी लग्न;4 दिवसांपूर्वी अपघातात गमावला पती,नंतर पत्नीचं धक्कादायक पाऊल

मध्य प्रदेश, 21 मे: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) निवारीमध्ये पतीच्या मृत्यूने पत्नीला इतका धक्का बसला की आत्महत्या करण्यासाठी तिने ओरछा येथील जहांगीर महल...

IPL 2022 : दोन कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स अडचणीत, आता चूक झाली तर खेळ समाप्त

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीचे सामने रविवारी संपणार आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians...

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

Most Popular

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होणार पण ‘या’ राशीने मात्र खर्च टाळावा

आज दिनांक 21 मे 2022 वार शनिवार. आज वैशाख कृष्ण षष्ठी. चंद्र आज मकर राशीत भ्रमण करेल. तिथून तो राहुशी केंद्र योग करेल. पाहूया आजचे...

मोठा धक्का! रोमँटिक भूमिकांमध्ये झळकलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला अचानक काय झालं?

मुंबई : एक स्त्री असणं वाटते तितकी सोपी गोष्ट नाही, हे एक स्त्रीच जाणू शकते. कारण, स्त्रिच्या वाट्याला येणारी प्रत्येक गोष्ट क्षणाक्षणाला तिची...

वडिलांच्या 60व्या वाढदिवशी अभिज्ञाने उडवली धम्माल, Instagram Reel व्हायरल

मुंबई, 20 मे: सोशल मीडिया विशेषतः इन्स्टाग्राम (Instagram) हे खूप लोकप्रिय अ‍ॅप आहे. कॉलेजच्या तरूण-तरूणींपासून ते नेते मंडळींपर्यंत सगळेजण ते वापरतात. आपल्या आयुष्यात...

हाय गर्मी ! , तुमच्या मुलाला उष्माघातापासून वाचवण्यासाठी या ५ गोष्टी नक्की करा

वातावरणातील बदलाचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांवर होत असतो. लहानमुलींचे प्रतिकार शक्ती कमी असल्याने जर वातावरणात जर काही बदल झालेच तर त्याचा थेट...

देशाच्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या जीवनातील काही रंजक गोष्टी

Rajiv Gandhi Death Anniversary : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त देशभरात त्यांचे स्मरण...