Saturday, July 2, 2022
Home भारत maratha reservation : 'आरक्षणासाठी समाजा-समाजाने रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडायची का?'

maratha reservation : ‘आरक्षणासाठी समाजा-समाजाने रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडायची का?’


नवी दिल्लीः १०२ व्या घटना दुरुस्तीने राज्यांना उद्ध्वस्त केलं. पण या नव्या घटनादुरुस्तीनेही न्याय मिळणार नाहीए. नवी घटनादुरुस्ती म्हणजे ‘आगीतून उठवून फुफाट्यात टाकणं’, असं म्हणावं लागले. महाराष्ट्रातील मराठा समाज, गुजरातमधील पाटीदार समाज, कर्नाटकातील लिंगायत समाज आणि हरयाणातील जाट समाजांना आरक्षण हवं आहे. लोकशाहीला आदर्श देणारं लाखोंच्या संख्येत शांततेत आंदोलन मराठा समाजाने केलं. धनगर समाजाने केलं. इतर समाजानेही त्या आंदोलनाचा आदर केला, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले.

केंद्र सरकारने आरक्षणासंबंधी घटनादुरुस्ती विधेयक आणलं, पण ते अपूर्ण आहे. जेवायला चंदनाचं पाट आणि सोन्या ताट दिला. पण ताटात काहीच नाही. ना मीठ, लोणचं. पंचपक्वान्न नाही. राज्यांना खूप काही दिलंय, असं मंत्री म्हणत आहेत. पण नेमका कोणता अधिकार दिला? मराठा समाज असो की गुर्जर समाज त्यांच्या आरक्षणासाठी कोणती तरतूद केली? हे सरकारने स्पष्ट करावं, अशी मागणी राऊत यांनी केली.

मराठा समाजाला ओबीसींच्या २७ टक्क्यांमधून वाटा नकोय. इतर कोणत्याही आरक्षणातून वाटा नकोय. अतिरिक्त आरक्षण द्या, असं मागणी करणाऱ्या सर्व समाजांचं म्हणणं आहे. पण सरकारच्या घटनादुरुस्ती विधेयकात त्यांच्यासाठी काय तरतूद केली आहे? विधेयकात काहीच नाहीए. केंद्र सरकार म्हणेल, आम्ही विधेयक मंजूर केलं. पण हातात तर काहीच नाही दिलं. केंद्र सरकारने कशासाठी आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करावं, अशी मराठा समाजाची भावना आहे. यामुळे आरक्षण द्यायचं असेल तर भरभरू द्या, अशी मागणी राऊत यांनी केली.

इंदिरा साहनी खटल्यात सुप्रीम कोर्टाने ३० वर्षापूर्वी आरक्षणावर ५० टक्क्यांची मर्यादेचे निर्देश दिले होते. पण आता २०२१ सुरू आहे. देशाची लोकसंख्या १३० कोटी आहे. आरक्षित समाजांची संख्या वाढली. मराठा समाज ३५ टक्के आणि धनगर समाज १० टक्के, तर समाज आहेत. मुस्लिम समाज आहेत. देशातील १५ राज्यांनी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवली आहे. हरयणा, मिझोराम, ईशान्येतील बहुतेक आणि तामिळनाडूनेह आरक्षणाची मर्यादा वाढवली आहे. स्वातंत्र्याचं ७५ व्या वर्ष साजरं करतोय. आता तरी न्याय हवा आहे, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातील मराठा, गुजरातचे पाटीदार, राजस्थानातील गर्जुर या वंचित समाजांना ५० टक्के आरक्षणाच्या कक्षेत आणणार का? नव्या घटनादुरुस्तीतून केंद्र सरकारने समाजा-समाजाला रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडण्याची संधी या विधेकाच्या मध्यामातून दिली आहे, असा आरोप होतोय. आम्हाला न्याय हवा आहे. पण न्याय देताना भांडणं लावू नका. आरक्षणासाठी ओबीसी आणि मराठा समाजांमध्ये भांडणं लावू नये. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला हात लावता कामा नये, असं विनायक राऊत म्हणाले.

‘आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून मराठा समाजाला आरक्षण द्या’, काँग्रेसची लोकसभेत मागणी

राज्यांना अधिकार देत असताना राज्यांमधील राजकीय नव्हे तर सामाजिक स्थितीचा विचार करून आरक्षण दिलं पाहिजे. ५० टक्क्यांवर आरक्षण देण्याची तरतूद या विधेयक अपेक्षित होती. पण अशी कुठलीही तरदूत या विधेयकात नाहीए. महाराष्ट्रातील समाजांनी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं का? महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील समाजांनी आरक्षणासाठी एकमेकांच्याविरोधात उतरायचं का? पण सत्याचा न्याय कोणी करायचा? लोकशाहीचा देव रस्त्यावर उतरू आक्रोश करतोय. तीन वर्षांपासून न्यायासाठी झगडतोय. तरीही लोकशाहीच्या मंदिरातून न्याय मिळत नसेल, तर कोणाकडे विवंचना मांडायची? असा सवाल विनायक राऊत यांनी केला.

maratha reservation : आरक्षणासंबंधी १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक; केंद्राने टाकला

नव्या घटनादुरुस्ती विधेयकामुळे राज्य सरकारची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे. राज्यांना काहीही करता येणार नाहीए. कुठल्या आधारावर आरक्षण द्यायचं? हे काहीच स्पष्ट नाहीए. राज्यांवरील ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा हटवावी. राज्यांना हव्या त्या समाला आरक्षण देण्याची मुभा द्यावी, मराठा समाजाच्या पाठिशी संसदेनं उभ राहून आश्वासन द्यावं, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#maratha #reservation #आरकषणसठ #समजसमजन #रसतयवर #उतरन #एकमकच #डक #फडयच #क

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

Most Popular

अमित शहांचा फोटो बॅनरवरून का काढला? सदाभाऊ खोतांनी उत्तर न देता काढला पळ

मुंबई, 02 जुलै : राजकीय सत्ता संघर्षानंतर अखेरीस शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे.  पण, देवेंद्र...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्री ‘वन नाइट स्टँड’नंतर गरोदर

मुंबई : इंडस्ट्रीमध्ये असे अनेक रहस्य आहेत, जे अनेक वर्षांनंतर समोर येतात. कधी सेलिब्रिटींचे रिलेशनशिप, तर कधी 'वन नाइट स्टँड' बद्दल अनेक गोष्टी...

सैफचा लेक नाही, तर पलक तिवारी ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट

लेकीच्या अफेअरबद्दल श्वेता तिवारीला कल्पना? इब्राहीम खान नाही, तर 'या' अभिनेत्याला करते डेट   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Goregaon Aarey Colony : आरे कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त, कारशेडविरोधात उद्या आंदोलनाची हाक

<p>Goregaon Aarey Colony : आरे कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त, कारशेडविरोधात उद्या आंदोलनाची हाक</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...