Saturday, July 2, 2022
Home भारत maratha reservation : आरक्षणासंबंधी १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक; केंद्राने टाकला राज्यांच्या कोर्टात...

maratha reservation : आरक्षणासंबंधी १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक; केंद्राने टाकला राज्यांच्या कोर्टात चेंडू!


नवी दिल्लीः केंद्र सरकारने सोमवारी इतर मागासवर्गीयांशी (ओबीसी समाज) संबंधित एक महत्त्वाचे विधेयक लोकसभेत सादर केले. सरकारने १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक सादर केले आहे. या विधेयकात राज्य सरकारांना ओबीसीत मागस समाजांचा समावेश करण्याचा अधिकार देण्याची तरतूद आहे. अलिकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली होती. हे विधेयक काय आहे, ते आणण्याची गरज का होती आणि भविष्यात त्याचा काय परिणाम होईल? हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया…

विधेयकात काय तरतूद आहे?

केंद्र सरकारने आणलेल्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार राज्य सरकारे आता ओबीसींमध्ये मागास समाजांचा समावेश करू शकतील, अशी तरतूद आहे. म्हणजेच आता कोणत्याही जातीला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्यांना केंद्रावर अवलंबून राहावं लागणार नाही. याचा अर्थ असा की आता राज्य सरकारे त्यात ओबीसी समाजातील कोणत्याही जातीचा समावेश करू शकतील.

bjp issues whip : भाजपने खासदारांना बजावला व्हिप, संसदेत उपस्थित राहण्याचे निर्देश

घटनादुरुस्तीची गरज का?

कोणत्याही जातीला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा अधिकार राज्यांकडे नाही तर केंद्राकडे आहे. याचा हवाला देत सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द केले होते. सरकारने या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आक्षेप नोंदवला होता आणि या प्रकरणाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केलं होतं. पण सुप्रीम कोर्टाने ते फेटाळून लावलं होतं. ५ मे रोजी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिला होता.

maratha reservation : मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार; घटनादुरुस्ती विधेयकाला विरोधकांचाही केंद्राला पा

विरोधी पक्षाची भूमिका काय आहे?

सरकारने हे विधेयक मांडण्यापूर्वी काँग्रेससह १५ प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यावर चर्चा केली. इतर मागासवर्गीय (ओबीसी) संबंधित दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय आज झालेल्या विरोधकांच्या या बैठकीत घेण्यात आला. याबद्दल सरकारला आपण आधीच इशारा दिला होता, असं विरोधांचं म्हणणं आहे. पण सरकारने त्यांचं ऐकलं नाही. आता ओबीसी समाजाच्या आंदोलनामुळे सरकारला हे दुरुस्ती विधेयक आणण्यास भाग पडलं आहे.

maratha reservation : मराठा आरक्षणासंबंधी विधेयक केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत मांडलं

काय होईल परिणाम?

हे विधेयक संसदेने मंजूर केल्यानंतर राज्यांना ओबीसी प्रवर्गात त्यांना हव्या त्या जातींचा समावेश करण्याचा अधिकार असेल. अनेक राज्यांत विविध जाती ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाज, हरयाणातील जाट समाज, गुजरातमधील पटेल समाज आणि कर्नाटकातील लिंगायत समाज आरक्षणाची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत आता राज्यांना वेगवेगळ्या जातींचा ओबीसींमध्ये किंवा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकार असेल. म्हणजेच ओबीसी आरक्षणाबाबत केंद्राने आता राज्यांच्या कोर्टात चेंडू टाकला आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#maratha #reservation #आरकषणसबध #१२७ #व #घटनदरसत #वधयक #कदरन #टकल #रजयचय #करटत #चड

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

मोबाईल-लॅपटॉपचा अतिरेक झालाय; गंभीर आजार टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

मुंबई, 01 जुलै : सध्या प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन आणि लॅपटॉप वापरत आहे. फोन आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे डोळ्यांव्यतिरिक्त आरोग्याची अनेक प्रकारे हानी होत...

‘हा तर आश्चर्याचा धक्का’, शरद पवारांनी फडणवीसांना डिवचलं

मुंबई, 30 जून : भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी शक्यता होती. पण त्यांनी दुपारी घेतलेल्या...

दवबिंदू आरोग्यासाठी असतात फायदेशीर; अनेक त्रासांवर कसे उपयुक्त ठरतात वाचा

मुंबई, 01 जुलै : सकाळी सकाळी झाडे, फुले, पाने, हिरवे गवत यावर पडलेले दवबिंदू (Morning Dew) पाहून मन प्रफुल्लीत होते. असे म्हणतात की दवबिंदूंनी झाकलेल्या...

फेसबुक, इंस्टाग्रामनंतर आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार अवतार फिचर, जाणून घ्या

मुंबई, 29 जून: इंटरनेट ही काळाची गरज झाली आहे. सकाळी उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत आपण आपला जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर घालवतो. यातही आपला बहुतांश...

हे काय? पोटात बाळ नव्हे तर…; प्रेग्नंट महिलेचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले

लंडन, 01 जुलै : मळमळणं, उलटी, चक्कर येणं, मासिक पाळी चुकणं अशी सुरुवातीचा लक्षणं दिसल्यानंतर प्रेग्नन्सीचं पुढील लक्षण म्हणजे पोटाचा वाढणारा आकार. जसजसा...

Sanjay Raut ED Summons : संजय राऊत ईडी चौकशीसाठी पोहोचले, पत्राचाळ प्रकरण काय?

<p>Sanjay Raut ED Summons : संजय राऊत ईडी चौकशीसाठी पोहोचले, पत्राचाळ प्रकरण काय?&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...