Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या Mantralaya Liquor Bottles : चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल :...

Mantralaya Liquor Bottles : चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल : मंत्री Dattatray Bharne<p>राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो. सर्वसामान्यांची तपासीणी केल्याशिवाय, पासशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्याच मंत्रालयात चक्क दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात मंत्रालयातील दारूच्या बाटल्यांचा ढिग कैद झाला आहे. एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा असूनही मंत्रालयात दारूच्या बाटल्या आल्या कशा? मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमूर्तीच्या मागील बाजूस या दारूच्या बाटल्यांचा ढिगारा आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मंत्रालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तरी या दारूच्या बाटल्या आल्या कुठून आणि ही दारु रिचवणारे नेमके आहेत तरी कोण? याची माहिती कोणालाच नाही.&nbsp;</p>
<p>मंत्रालयातील अनागोंदी कारभाराचा एबीपी माझाकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचं कारणही महत्वाचं आहे. कारण मंत्रालय कुठलं मॉल सेंटर नाही किंवा कुठलीही खाऊ गल्ली नाही. तर ते राज्याच मुख्यालय आहे. संपूर्ण राज्याचा कारभार या मंत्रालयातून पाहिला जातो. याच मंत्रालयात सर्वसामान्य जनता आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपल्या आयुष्यातील गंभीर प्रश्न मांडण्यासाठी मंत्रालयात येत असतात. जर सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. पण मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा प्रश्न सध्या सर्वच स्तरांतून व्यक्त केला जात आहे.&nbsp;</p>
<p>या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, तसेच हे कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. दत्तात्रय भरणे याबाबत बोलताना म्हणाले की, "ही अत्यंत गंभीर बातमी आहे. याप्रकरणाची योग्य ती चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल." पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मंत्रालयाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ही पोलीस प्रशासनाकडेच असते. पण मंत्रालय म्हणजे, सर्व मंत्री, सर्व विभागांचा विषय येतो. हा केवळ गृहमंत्री किंवा पोलिसांचा विषय नाही."&nbsp;</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Mantralaya #Liquor #Bottles #चकश #करन #दषवर #कठर #करवई #कल #जईल #मतर #Dattatray #Bharne

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

आषाढी एकादशी जवळ येताच मिलिंद गवळींनी आठवला 21 वर्षांपूर्वीचा तो विलक्षण अनुभव

मुंबई, 05 जुलै: आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte) फेम अनिरुद्ध ( Aniruddha) म्हणजेच अभिनेते मिलिंग गवळी ( Milind Gawali)...

Big Breaking : मोदी सरकारमधील या केंद्रीय मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा

देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्र्याने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

डेंग्यू-चिकुनगुनियाचा नायनाट होणार! प्रयोगशाळेत निर्मित मादी डास नरांना भुलवणार!

नवी दिल्ली, 6 जुलै : पावसाळा येताच डासांपासून पसरणारे डेंग्यू-चिकुनगुनिया असे आजार पसरू लागतात. हे दोन्ही आजार जीवघेणे आहेत. वेळीच उपचार झाले नाही...

‘काॅफी विथ करण’मध्ये ५ वेळा आली होती आलिया भट्ट,आपल्या लग्नाबद्दल केलेली अचूक भविष्यवाणी

मुंबई : करण जोहरच्या काॅफी विथ करण शोचे प्रोमो व्हायरल झालेत. पहिल्याच भागात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट आहेत. २००४ पासून हा लोकप्रिय...

Gold Price : सोने-चांदी दरात घसरण, खरेदीची मोठी संधी

मुंबई : Gold Rate Update : आता बातमी आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारी. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडच्या किंमती 8...