Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या Maharashtra Rain : पुढील 2 महिन्यात राज्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता

Maharashtra Rain : पुढील 2 महिन्यात राज्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता


Maharashtra Rain Update : हवामान विभागाकडून ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. ऑगस्ट  ते सप्टेंबरदरम्यान देशात 95 ते 105 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर ऑगस्टमध्ये संपूर्ण देशात 94 ते 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्ट महिना पाहता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस दिसून येतो आहे. मात्र, पुढील दोन महिन्याचा विचार केला तर महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांच्याकडून पत्रकार परिषद घेत हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

जुलै महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाजआहे. मात्र, महाराष्ट्रात 25 टक्के अधिक पाऊस झाला. 

दरम्यान, जुलै महिन्यात हवामान विभागाकडून दुसऱ्या पंधरवाड्यात मोठा पाऊस होईल अशा अंदाज दुसऱ्या मॉडेलच्या माध्यमातून वर्तवण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरला. भारतीय हवामान विभागाकडून हा एक नवा प्रयोग केला जात आहे. ज्यात दर महिन्यातील मान्सूनच्या पावसाचा अंदाज वर्तवला जातो आहे. ज्याचा ह्यावर्षी हा पहिलाच प्रयोग आहे. 

ऑगस्ट महिन्याचा अंदाज बघितला तर कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी सरासरी गाठताना बघायला मिळत आहे. मात्र, मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीत देखीलसरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. 

दुसरीकडे, हवामान विभागाकडून मॉन्सूनच्या उत्तरार्धात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यानचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोलीतल्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ऑगस्ट  आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Maharashtra #Rain #पढल #महनयत #रजयत #पऊस #सरसरपकष #अधक #रहणयच #शकयत

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

आम्हाला हलक्यात घेऊ नका; झिम्बाब्वेने दौऱ्याआधीच भारताला दिला धोक्याचा इशारा

हरारे: भारतीय क्रिकेट संघ लवकर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघात ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे संघाचा फार दबदबा...

Government new policy: स्मार्टफोन आणि लॅपटॉप स्वस्त होणार? सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई: भारतात स्मार्टफोन, लॅपटॉपला, स्मार्टवॉच, फीचर फोन मोठी मागणी आहे. देश विदेशातील अनेक वेगवेगळ्या कंपन्या भारतात आपले नवीन प्रोडक्ट्स लाँच करीत असतात.या नवीन प्रोड्क्ट्सला चार्ज...

सर्वांना वाटतं आम्ही जीव द्यावा…; प्रेमी युगुलांची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहली आठ जणांची नावं

Rajasthan News: सुनील, पूजा, पीयूष, पंकज, लक्ष्मी, भूरी देवी, रामवीर जुट्टो या आठ जणांमुळं आम्ही आत्महत्या करत आहोत. आम्हा दोघांच्या मृत्यूनंतर सोनूच्या कुटुंबीयांना...

७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिओची पैसा वसूल ऑफर, फ्रीमध्ये रिचार्ज करा हा वार्षिक प्लान

नवी दिल्लीःReliance Jio Independence Day : स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीमेची घोषणा केली आहे....

Girish Mahajan at Jalgaon : मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन यांचं जळगावात जंगी स्वागत

Girish Mahajan at Jalgaon : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) आज प्रथमच जळगावमध्ये...