Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या Maharashtra Political Crisis : शिवसेनेत बंडखोरी; राड्याच्या शक्यतेने मुंबई पोलीस अलर्ट...

Maharashtra Political Crisis : शिवसेनेत बंडखोरी; राड्याच्या शक्यतेने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर


Maharashtra Political Crisis Mumbai Police:  शिवसेनेत झालेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला सोडल्यानंतर ते मातोश्रीवर दाखल झाले आहेत.ए त्यानंतर आता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी गृह विभागाने पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. बंडखोरी केलेल्या शिवसेना आमदारांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 

शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाले आहे. जवळपास 35 ते 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आता मूळ शिवसेना पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला आहे. या बंडखोरीमुळे राज्यातील शिवसैनिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या बंडखोर आमदारांना शिवसैनिक लक्ष्य करू शकतात. या आमदारांच्या घरांवर हल्ला होण्याचीही शक्यता आहे,  असा राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल आहे. गृह विभागाने पोलिसांना कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सज्ज राहावे अशी सूचना केली आहे. 

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटातील आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. या घटनेनंतर शिवसेनेत मोठा भूकंप आला आहे. 

एकनाथ शिंदे हे आपला नवा गट स्थापन करण्याऐवजी आपलाच गट हा शिवसेनेचा मूळ गट आहे, असा दावा करण्याची शक्यता आहे. त्यांनी आता प्रतोदपदावर भरत गोगावले यांची नियुक्ती केली असून शिवसेनेचे विद्यमान प्रतोद सुनिल प्रभू यांची प्रतोदपदावरून हकालपट्टी केली असल्याचे सांगितले आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Maharashtra #Political #Crisis #शवसनत #बडखर #रडयचय #शकयतन #मबई #पलस #अलरट #मडवर

RELATED ARTICLES

Aadhar Cardलाही असते एक्सपायरी डेट! असं करता येतं रिन्यू

मुंबई, 6 जुलै: आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्रं म्हणून वापरलं जाणारं ओळखपत्र बनलं आहे. आधारकार्ड आता जवळपास सर्व शासकीय योजनांसाठी गरजेचं असतं. थोडक्यात...

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Raigad Rains :  रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ABP Majha

<p>&nbsp;रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ,&nbsp; कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून , पुढील ३ दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'</p> अस्वीकरण:...

Most Popular

अभिनेत्रीला जोडीदाराकडून मारहाण; फोटो इतके भयंकर की, दाखवणंही कठीण

मुंबई : घरगुती हिंसाचाराचा शिकार होणाऱ्या महिलांसोबत जे घडतं ते ऐकताना अंगावर काटा येतो. मनात विषण्ण करणारी भावना घर करते, आपण किती हतबल...

Raigad Rains :  रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ABP Majha

<p>&nbsp;रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ,&nbsp; कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून , पुढील ३ दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'</p> अस्वीकरण:...

अखेर Bermuda Triangle चं रहस्य उलगडलं? प्रसिद्ध शास्त्रज्ञाचा दावा की…

ऑस्ट्रेलिया : Bermuda Triangle च्या परिसरात विमान आणि जहाजं गायब झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान आजपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. मात्र आता...

Blood Group Affect Pregnancy : रक्तगटाचा गर्भधारणेवर परिणाम होतो? मग तो कसा

अनेकांना आपला रक्तगटचा कोणता? याबद्दल माहिती नसते. प्रत्येक महिलेने आपल्या गर्भधारणेपूर्वीच रक्तगटाची माहिती करून घेणे गरजेचे असते. सामान्यपणे रक्तगट ए, बी, एबी आणि...

आषाढी एकादशीनिमित्त ‘विठ्ठला तूच’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित!

मुंबई 6 जुलै: सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या अनेक कलाकार हे विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या...

Special Report : काय पाऊस … काय रस्ते… काय खड्डे… सगळं नॉट ओके, मुंबईत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

<p><strong>Special Report :</strong> राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात आजच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांचं सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं. पण आता सत्तेची खुर्ची स्थिर झाल्यावर तरी त्या समस्या...